पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : प्रणिती शिंदे यांच्याकडून आचारसंहिता भंग? (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे पुन्हा अडचणीत आल्या आहेत. त्यांनी मतदारांना त्यांचा फोटो असलेला मेकअप बॉक्स देऊन आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार माजी आमदार आणि माकप नेते आडम मास्तर यांनी दिली आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज (शनिवार) केली. त्यानंतर राज्यात दुपारी आज दुपारी साडेबारा वाजता आचारसंहिता लागू झाली. मात्र, त्यानंतर प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स देऊन आचारसंहिता भंग केला, अशी तक्रार आडम मास्तर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली. पाच वर्षांत काम न केल्यानेच प्रणिती शिंदे यांना मतदारांना आकर्षित करावे लागत आहे, अशी टीकाही आडम मास्तरांनी यावेळी केली.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी भोसले यांनी दिले आहे.

आडम मास्तर यांची स्टंटबाजी : प्रणिती शिंदे

आडम मास्तर निव्वळ स्टंटबाजी करत आहेत. ते महिलांचा अपमान करत आहेत, अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी आडम मास्तर यांच्यावर टीका केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT