sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत पुन्हा निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली नियमावली

राज्य शासनाकडून यापूर्वी कोरोनाच्या सुधारीत आदेशान्वये मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या

सकाळ वृत्तसेवा

राज्य शासनाकडून यापूर्वी कोरोनाच्या सुधारीत आदेशान्वये मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या

सांगली : कोराना साथीच्या पार्श्‍वभूमिवर सांगली जिल्ह्यात आजपासून कोणताही कार्यक्रम, समारंभाच्या उपस्थितीसह अनेक निर्बंध जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी लागू केले आहेत. राज्य शासनाकडून यापूर्वी कोरोनाच्या सुधारीत आदेशान्वये मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. जिल्हादंडाधिकारी डॉ. चौधरी यांनी कोरोना फैलाव प्रतिबंधासाठी तात्काळ लागू केले आहेत.

दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे), इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे. आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. कोणताही कार्यक्रम, समारंभ, इत्यादींमधील उपस्थितीवरील क्षमतेच्या ५० टक्के निर्बंध असतील. त्यात चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय, बंदिस्त जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाचा समावेश असेल. संपूर्ण खुल्या असलेल्या समारंभांसाठी जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.

मेळाव्यासाठी लोकांची संख्या 1 हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे इतर वाजवी निर्बंध कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास जर योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी, यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविता येतील. परंतु कमी करता येऊ शकणार नाहीत. मात्र, जाहीर नोटीसद्वारे 48 तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही. याशिवाय लसीकरण, मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर वापर, गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT