पश्चिम महाराष्ट्र

महाविद्यालयीन तरुणीचे मुरगुडात भरदिवसा अपहरण

सकाळ वृत्तसेवा


मुरगूड (कोलहापूर)  : येथील महाविद्यालयासमोरूनच भरदिवसा तरुणीला जबरदस्तीने मोटारीत घालून तिचे अपहरण केल्याची घटना घडली. आज दुपारी दोनच्या सुमारास चित्रपटाला शोभेल अशा थरारक पद्धदतीने अपहरणाचे कृत्य घडल्याने शहरात खळबळ उडाली. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.

अधिक माहिती अशी, शहरातील एका नामवंत महाविद्यालयात ही मुलगी आज सकाळी गेली होती. महाविद्यालय सुटल्यनंतर ती प्रवेशद्वारा बाहेर आली असता तिच्या पाळतीवर असलेल्या व भरधाव आलेली मोटार (एमएच 02 9109) मधील धीरज ऊर्फ गुंड्या दिलीप सावर्डेकर (मुरगूड) आणि त्याचा मित्र विजय मारुती फराकटे (चिमगाव) यांनी जबरदस्तीने तरुणीला मोटारीतून अपहरण केल्याची फिर्याद तरुणीच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे.

अपहरण होत असताना तरुणीने ओरडा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या ओरड्यामुळे मुरगूड-कापशी मार्गावरील ही थरारक घटना चित्रपटाला शोभेल अशीच होती. यावेळी काहींनी अपहरण केलेल्या मोटारीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; पण ते त्यात अपयशी ठरले. ही घटना पोलिसांना समजताच पोलिसांनीदेखील सुमारे पंधरा किलोमीटरपर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; पण अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. अपहरण झालेल्या तरुणीच्या वडिलांनी धीरज ऊर्फ गुंड्या दिलीप सावर्डेकर (मुरगूड ) आणि त्याचा मित्र विजय मारुती फराकटे (चिमगांव) यांच्याविरुद्ध मुरगूड पोलिसांत तक्रार दिली आहे. घटनेनंतर पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT