Sangli Crime News esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : लग्नाचं आमिष दाखवून सांगलीत महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार; शाहिदनं लॉज-कॅफेत नेलं अन् तिच्यावर..

Sangli Crime News : काही महिन्यांपूर्वी सांगलीतील एका कॅफेमध्ये एका युवतीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

पीडितेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने शाहिद मुजावर याने तिला सोमवारी (ता. ७) शहरातील एका लॉजमध्ये बोलावून घेतले. त्या ठिकाणीही त्याने जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.

सांगली : शालेय शिक्षणापासून असलेल्या ओळखीचा आणि परिस्थितीचा फायदा घेऊन लग्नाचे (Married) आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Sangli Police) संशयित शाहिद इकबाल मुजावर (वय १९, रा. सम्राट व्यायाम मंडळाजवळ, सांगली) याला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध (Atrocity) अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवती आणि संशयित शाहिद मुजावर शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखतात. पीडितेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन संशयिताने तिच्याशी अधिक जवळीक केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून लॉज आणि कॅफे शॉपमध्ये येण्यास भाग पाडून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.

पीडितेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने शाहिद मुजावर याने तिला सोमवारी (ता. ७) शहरातील एका लॉजमध्ये बोलावून घेतले. त्या ठिकाणीही त्याने जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या घटनेनंतर पीडित युवतीने संशयित शाहिद मुजावर याच्याविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली. पोलिस उपाधीक्षक विमला एम. अधिक तपास करत आहेत.

'कॅफे'पासून सुरुवात

काही महिन्यांपूर्वी सांगलीतील एका कॅफेमध्ये एका युवतीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीन ‘कॅफें’ची तोडफोड केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने कॅफेसंबंधी निर्बंध लागू केले; परंतु आजही असे कॅफे सुरू आहे. या घटनेची सुरुवातही कॉलेज कॉर्नर येथील एका कॅफेतूनच झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे पोलिस आता या कॅफेंच्या मुळावर घाव घालणार का, असा सवाल उपस्थित होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT