corona logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

दिलासा : "तबलिग' च्या संपर्कातील  चौघांसह दहाजणांचा अहवाल "निगेटिव्ह' 

सकाळवृत्तसेवा

सांगली- दिल्लीतील निजामुद्दीन येथील "तबलिग-ए-जमात' च्या मेळाव्यात सहभागी झालेल्या व संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील चौघांसह दहाजणांच्या "स्वॅब' चे अहवाल "निगेटिव्ह' आले आहेत. सांगली, तासगाव मधील हे संशयित आहेत. आणखी दहा जणांचे अहवाल आज (ता.3) सायंकाळपर्यंत हाती येतील असे सांगण्यात आले. 


दिल्लीतील निजामुद्दीन येथे "तबलिग-ए-जमात' च्या मेळाव्यात सहभागी झालेले अनेकजण "कोरोना' बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. मेळाव्यात देशभरातून हजारो सहभागी झाले होते. त्यापैकी जिल्ह्यातील तिघेजण मेळाव्यात सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. या तिघांना दिल्लीतच "होम क्वारंटाईन' करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील एकजण आणि त्या कालावधीत दिल्लीतून मुंबई प्रवास करणारे तिघेजण अशा चौघांना जिल्हा प्रशासनाने क्रीडा संकुलातील इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 


"तबलिग' च्या मेळाव्यात सहभागी लोकांशी संपर्क आलेल्या आणि इतर अशा 20 जणांच्या घशातील "स्वॅब' चे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. याच्या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यापैकी दहाजणांचे अहवाल दुपारी प्राप्त झाले. त्यामध्ये "तबलिग' शी संबंधित चौघेजण आणि सांगली-तासगावमधील सहाजण अशा दहाजणांचे अहवालन "निगेटिव्ह' आले. त्यामुळे संबंधितांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. अद्याप दहाजणांचे अहवाल बाकी असून सायंकाळी उशिरापर्यंत ते प्राप्त होतील असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. 
दरम्यान सांगलीतून जे 24 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 14 नमुन्याचा अहवाल आतापर्यंत प्राप्त झाला असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT