nitin kapadnis.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आयुक्त म्हणतात..."ऍप' वरून जीवनावश्‍यक वस्तू मिळवा 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' चा प्रसार रोखण्यासाठी घराबाहेर पडू नका. जीवनावश्‍यक वस्तू किंवा किराणा माल आवश्‍यक असेल तर "ऍप' वरून मागवून घ्या असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 


संचारबंदी काळातही नागरिक किराणा माल, भाजीपाला आणि दूध खरेदीसाठी गर्दी करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन केल्यानंतरही अनेकजण त्याचे पालन करत नाहीत. तसेच खरेदीच्या नावाखाली अनेकजण घराबाहेर पडण्याचे धाडस करत आहेत. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने लाठी उगारावी लागत आहे. कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळून घरात बसणे हाच प्रभावी उपाय आहे. परंतू अनेकांना त्याचा विसर पडला आहे. सध्या घरपोहोच भाजीपाला सुरू करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक प्रभागातील किराणा दुकानदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तरीही खरेदीसाठी गर्दी केली जाते. 


एकीकडे ही परिस्थिती असताना खानावळी आणि मेसवर जेवण अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. घरपोहोच डबे मिळण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. वृद्ध मंडळी आणि नोकरदार तसेच इतरांची ही अडचण लक्षात घेऊन महापालिका आयुक्त कापडणीस यांनी जीवनावश्‍यक वस्तू, किराणा माल मोबाईल "ऍप' च्या माध्यमातून घरपोहोच मिळवा असे आवाहन केले आहे. mobifood हे मोबाईल "ऍप' मोबाईलवर "डाऊनलोड' करून त्यावर मागणी नोंदवा, अथवा 8181921717 व 9850776771 या क्रमांकावर कॉल करूनही मागणी नोंदवून घरपोहोच वस्तू किंवा किराणा मिळवा असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT