Mahapalika.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आयुक्‍तांचा दम ः बोगस बिले काढणाऱ्यांवर कारवाई

सकाळवृत्तसेवा

सांगली ः गतवर्षी महापुराच्या काळात आलेली मदत तसेच शहर स्वच्छता आणि पूरग्रस्तांच्या जेवणासह सर्वच व्यवस्थेवर झालेल्या खर्चाचा ताळेबंद तयार आहे. विभागप्रमुखांना त्यांचे हिशेब उपायुक्तांना सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. हा ताळेबंद महासभा आणि स्थायी समिती सभेला सादर करण्याचे निर्देश उपायुक्तांना दिले आहेत. तसेच गतवर्षीच्या महापुराच्या काळात झालेल्या सर्व व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्यात येईल. अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

आयुक्त कापडणीस म्हणाले, महापुरानंतर शहराच्या स्वच्छतेसाठी जेसीबी, डंपर आदी वाहने वापरली. ती आरटीओच्या मान्यतेने घेतली आहेत. त्यातील एका ठेकेदारास बिले दिली आहेत. तरीही शासनाच्या लेखापरीक्षण विभागामार्फत या सगळ्याची तपासणी करून घेऊ. महापुरानंतर स्वच्छतेसाठी बाहेरच्या नगरपालिका, महापालिकांतून आलेल्या वाहनांना फक्त डिझेल दिले होते.

महापालिकेने जी वाहने भाड्याने घेतली त्याची तपासणी आरटीओकडून घेतली होती. प्रभागात काम करणारी वाहने आणि भाड्याने घेतलेल्या वाहनांची यादी स्वतंत्र आहे. कोल्हापूरचा एक ठेकेदार व महापालिकेचा नालेसफाई करणारा पूर्वीचा ठेकेदार यांच्याकडूनच मशिनरी घेतली होती. अन्य कोणाची वाहने घेतली नाहीत. त्यातील जुन्या ठेकेदाराची काही बिले दिली. उर्वरित बिले दिलेली नाहीत. 


बोगस बिले काढणाऱ्यांवर कारवाई 
गतवर्षीच्या महापुरानंतर स्वच्छतेसाठी वापरलेल्या यंत्रणेत बोगस बिले काढण्याचा प्रकार केला असल्यास संबंधितांवर कारवाई करू, असा इशारा आयुक्त कापडणीस यांनी दिला आहे. मनसेने वाहनांच्या क्रमांकानुसार जे पुरावे दिले आहेत त्याची शहानिशा करू. ज्या वाहनांना डिझेल देऊन वापर केला होता त्याची खातरजमा करू. खोटी वाहने दाखवून बिले काढायचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर कठोर कारावई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

कोट 
महापुराच्या काळात गैरकारभार होऊ नये यासाठी आवश्‍यक खबरदारी घेतली होती. महापुराच्या काळातील सर्वच व्यवहारांचे लेखापरीक्षण करुन त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना या विभागाचे अधिकारी श्री. केंबळे यांना केली आहे. त्यामुळे दूध का दूध, पानी का पानी होईल. कोणी दोषी असेल तर त्याच्या पदरात त्याचे माप टाकू. 
श्री. नितीन कापडणीस, आयुक्त. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT