इस्लामपूर (जि. सांगली) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर राज्य शासनाने स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून त्यामुळे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी आता अॅक्टिव्ह' होऊ लागले आहेत. या परीक्षांची तयारी करून घेणारी केंद्रे मधल्या काळात ऑनलाइन सक्रिय होती, त्यांच्याकडून क्लास सुरू करण्याच्या आदेशाची प्रतीक्षा सुरू आहे. नुकत्याच लागलेल्या राज्य सेवेच्या निकालाचाही सकारात्मक परिणाम या विद्यार्थ्यांवर होणार आहे.
राज्य शासनाने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्यसेवेची 200 पदे तर पीएसआय, एसटीआय व असिस्टंट पदाच्या 810 जागांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोनामुळे तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात बहुतांश विद्यार्थी, त्यांचा अभ्यास थांबला होता; परंतु काही अॅक्टिव्ह केंद्रांनी ऑनलाइन माध्यमातून या विद्यार्थ्यांशी कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवली होती. कोरोनाचा मोठा फटका विद्यार्थी आणि केंद्रे या दोन्ही घटकांना बसला होता. नकारात्मक वातावरणामुळे अनेक विद्यार्थी अधिकारी बनण्याच्या आपल्या स्वप्नांना मुरड घालून 'वेगळा विचार' करत असताना शासनाने गट अ व ब मधील सुमारे 1010 जागांसाठी परीक्षा जाहीर करून एकअर्थी दिलासाच दिला आहे. त्यामुळे हे विद्यार्थी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होण्याच्या मार्गावर आहेत.
इस्लामपूर हे शहर सांगली जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्राचे आणि चांगल्या निकालाचे माहेरघर मानले जाते. या ठिकाणी विविध भागातून सुमारे 10 हजार विद्यार्थी अभ्यास करतात. निकालही चांगला लागतो. दरवर्षी नव्याने किमान 1 हजार विद्यार्थी अभ्यास सुरू करतात. शहरातीलच परंतु पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन अभ्यास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे आणि ते सर्व सध्या शहरात परतले आहेत. अशा सर्वांना या परीक्षा दिलासा देणाऱ्या ठरतील.
"लॉकडाऊन काळात विद्यार्थी संपर्क कायम ठेवून ऑनलाइन टेस्ट सुरूच ठेवल्या होत्या. कौन्सिलिंग आणि तयारी करून घेणे सुरूच होते. आता परीक्षा जाहीर झाल्याने विद्यार्थी मरगळ झटकून अभ्यासाला लागतील."
-अस्लम शिकलगार-सुतार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
"कोरोनामुळे क्लास थांबले तरी विद्यार्थी संपर्कात होते. फोनवरून मार्गदर्शन सुरूच ठेवले होते. ऑनलाइन अभ्यास आणि परीक्षांना चांगला प्रतिसाद मिळाला. परिक्षांमुळे विद्यार्थीसंख्या घटण्याचा धोका टळेल."
-विक्रांत पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.