biometric attendance sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : आरोग्य खात्यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती

८० टक्केपेक्षा कमी हजेरी असल्यास वेतन कपात

विनायक जाधव

बेळगाव : आरोग्य खात्यामध्ये यापुढे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती केली जाणार आहे. या हजेरीच्या आधारावरच कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार असून ८० टक्केपेक्षा कमी हजेरी असल्यास वेतन कपात केली जाणार आहे.

कोरोणा संसर्गामुळे मागील दोन वर्षापासून बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद करण्यात आली होती. त्यामुळे काही कर्मचारी आणि अधिकारी सेवेवर गैरहजर राहत असल्याचे दिसून आल्याने पुन्हा बायोमेट्रिक सक्तीची केले जात आहे. आरोग्य खात्याच्या अखत्यारीत येणारे सर्व कार्यालय,‌ रुग्णालय आणि संस्थामध्ये डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी, अधिकारी या सर्वांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची असणार आहे. ८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली जाणार असून त्याला कारणे दाखवा नोटीस देखिल बजावली जाणार आहे.

कर्मचाऱ्यांना दिवसातून तीन वेळा आपली हजेरी देणे बंधनकारक असणार आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सकाळी दहा, दुपारी एक वाजता आणि सायंकाळी साडेपाच वाजता हजेरी द्यावी लागेल. तर रुग्णालयात काम करणारे डॉक्टर परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना सकाळी नऊ, दुपारी एक आणि सायंकाळी साडेचार वाजता हजेरी द्यावी लागणार आहेत. तर रुग्णालयात शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना देखील त्यांच्या आठ तासाच्या सेवेनुसार तीन वेळा हजेरी द्यावी लागणार आहे. आरोग्य खात्याकडून याबाबतचे आदेश बजावण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport News: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद राहणार; का आणि कधी? जाणून घ्या...

Chakan Crime : चाकण औद्योगिक वसाहतीत भाडेकरूंची नोंदणी अपुरी; गुन्हेगारांना आश्रय, कायदा-सुव्यवस्थेला गंभीर धोका

तमिळनाडूत मोठा ट्विस्ट! थलापती विजय मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार; काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडली, एका अटीवर टीव्हीकेला पाठिंबा

Sindkhed Raja Development: सिंदखेड राजाच्या विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून तात्काळ ९.२५ कोटींच्या निधीची मागणी

Virar Samuhik Lagna Sohla: विरारच्या जीवदानी देवी संस्थानतर्फे भव्य सामुदायिक विवाह सोहळा; २१ जोडपी विवाहबंधनात

SCROLL FOR NEXT