the condition of election cost to candidate not asking in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

निवडणूक उमेदवारांना आता रान मोकळेच ; ना खर्चाची मर्यादा, ना हिशेब द्यावा लागणार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा दिवसेंदिवस रंगतदार बनत चालला आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांनी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी केली आहे. इतर निवडणुकांत उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून देण्यात आलेली असते; मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत खर्चाची मर्यादा घालण्यात आलेली नाही. तसेच निवडणूक खर्चाचा हिशेबही द्यावा लागणार नसल्याने उमेदवारांना एक प्रकारे रान मोकळे झाले आहे.

कोणत्याही परिस्थितीत जिंकलेच पाहिजे, यासाठी जवळजवळ सर्वच उमेदवारांनी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी केली आहे. तर रिंगणातील सधन उमेदवारांकडून त्यापेक्षाही अधिक खर्च होणार आहे. बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये एका प्रभागात किमान पाचहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याकडून मतदारांना जेवणावळीबरोबरच गावासाठी आर्थिक मदत, तसेच अन्य खर्च असा किमान दोन ते तीन लाखांपर्यंत खर्च केला जाण्याची शक्‍यता आहे. तर काही ठिकाणी उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी लाखो रुपयांची बोलणीही झाली आहेत. यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बहुसंख्य उमेदवारांकडून लाखोंचा खर्च होणार आहे.

गेल्या तीस वर्षांत ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाने उघडपणे भाग घेतला नव्हता. यामुळे उमेदवारांचे काही हजारांवर भागत होते. मात्र, यंदा प्रमुख राजकीय पक्षांनी ग्रामपंचायतीत आपले समर्थक आणि पुरस्कृत उमेदवार उभे केल्याने उमेदवारांचा खर्च लाखाचा टप्पा ओलांडणार आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनाही खर्चाची मर्यादा घालण्याची मागणी आता होऊ लागली आहे. 

निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे; अन्यथा आर्थिक सबल असणाऱ्या उमेदवारांकडून मतदारांची खरेदी होण्याची शक्‍यता वाढली आहे. अन्य निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनाही खर्चाची मर्यादा निश्‍चित करण्यात यावी, अशी मागणी काही जणांनी केली आहे. 

"निवडणूक आयोगाने स्थानिक संस्था असणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत प्रचार खर्चावर मर्यादा निर्धारित केली आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना दैनंदिन खर्चाचा कोणताही हिशेब द्यावा लागणार नाही. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या खर्चाची मर्यादा निर्धारित करण्यात आली नाही."

- एम. जी. हिरेमठ, जिल्हा निवडणूक अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT