corona patients
corona patients sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती भीषण

सकाळ वृत्तसेवा

जिल्हाधिकारी रजेवर आणि पालकमंत्री फिरकत नसल्यामुळे नियमित कामकाज आणि विकासकामांवर परिणाम होताना दिसत आहेत.

बेळगाव - जिल्हाधिकारी (Collector) रजेवर आणि पालकमंत्री (Guardian Minister) फिरकत नसल्यामुळे नियमित कामकाज आणि विकासकामांवर परिणाम होताना दिसत आहेत. जिल्ह्यातील कोविड संसर्गाची (Covid Infection) स्थिती भीषण झाली. बाधितांचा सरासरी टक्का ५ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. कोरोना संसर्गाची तिसरी लाट (Third Wave) गंभीर झाली असताना व्यवस्थापन आणि तयारीवर लक्ष ठेवण्याची नितांत गरज आहे.

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना गेल्या आठवड्यात कोरोना संसर्ग झाला. उपचार घेण्यासाठी ते क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे नियोजनावर मोठा परिणाम जाणवत आहे. त्यांच्याजागी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार आहे. अधिकाऱ्यांवर वचक आणि कोरोना संसर्ग चांगल्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता जिल्हाधिकारी हिरेमठ यांच्याकडे आहे. त्याची अनुभूती पहिल्या व दुसऱ्या लाटेत आली आहे. पण, सध्या ते कोरोना संसर्ग झाल्याने रजेवर आहेत. तर पालकमंत्री गोविंद कारजोळ हे बेळगावसाठी पाहुणे ठरत असल्याने जिल्ह्याच्या विकासकामावर आणि नियमित कामकाजावर परिणाम जाणवत आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका आणि विकासकामांचा आढावा बेळगावातील विधिमंडळ अधिवेशनपासून बंद झाले आहे. प्रशासकीय कामकाज जवळपास थंडावले आहे. अधिकाऱ्यांवरील वचक कमी झाल्याची चर्चा आहे.

बेळगावात १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोरोना-१९ लसीकरण मोहीम झाली. त्याच्या उद्‍घाटनाला पालकमंत्री उपस्थित राहिले. परंतु, यापूर्वी आणि त्यानंतर भेट दिली नाही. जनसामान्यांच्या मागण्यांवर कार्यवाही, निवेदन स्वीकारणे आदींसाठी पालकमंत्री जनतेला भेटत नाहीत आणि मंत्र्यांचे अधिकृत कार्यालयही उघडण्यात आलेले नाही, अशी तक्रार आहे. धारवाडचे माजी मंत्री जगदीश शेट्टर बेळगावचे पालकमंत्री असताना आठवड्यातून एकदा बेळगाव भेट द्यायचे आणि विकासकामांचा आढावा घ्यायचे. रमेश जारकीहोळी पालकमंत्री असताना तेही नियमित अधिकाऱ्यांची भेट घेत व जनतेला भेटायचे. परंतु, कारजोळ यांचे दर्शन मिळणे दुरापास्त ठरत असल्यामुळे विषय चर्चेचा ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT