पश्चिम महाराष्ट्र

सैन्य भरती झालीच पाहिजे यासाठी उमेदवारांचा ठिय्या

भूषण पाटील

कोल्हापूर - अनपेक्षितपणे उमेदवारांची वाढलेली संख्या व  नियोजनाचा अभाव यामुळे आज सैन्य भरतीसाठी आलेल्या हजारो युवकांना नाहक त्रास सहन करावा लागला. संतप्त उमेदवारांनी सैन्य भरती झालीच पाहिजे, शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी करत मराठा लाईट इंफॅन्ट्री बटालियांच्या दारात जवळपास तीन तास ठिय्या मांडला.

परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात असल्यासाचे लक्षात येताच पोलिस पथक व दंगलकाबू पथक घटनास्थळी दाखल करण्यात आले. या पथकांमुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. सुरु असलेला गोंधळ लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी भरती सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी तीन दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षक काकडे व पोलिस निरिक्षक शशीराज पाटोळे यांनी बाहेर येऊन सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना तशी माहिती देत संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच उद्या पहाटे पुन्हा भरतीसाठी उमेदवारांना प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगितले. यानंतर उमेदवारांनी आंदोलन मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT