malkapur
malkapur 
पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेस - भाजपमध्ये प्रतिष्ठेची चुरस

राजेंद्र ननावरे

मलकापूर : पालिकेच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या प्रभाग आरक्षण व रचनेच्या पहिल्या टप्प्यात काही राजकीय मातब्बरांवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. काही राजकीय नेते सेफ झाले असले तरी आघाडी काय व सोबतचा उमदेवार कोण येणार यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहिले आहे. ज्यांना अन्य प्रभाग शोधावा लागला आहे. त्यांना स्थानिक लोक किती स्विकारणार तेही येणारा काळ ठरणार आहे.

भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना यांना रणांगणात शड्डू ठोकला असला तरी लढतीचे मुख्य आकर्षण कॉग्रेस विरूद्ध भाजपच असण्याची दाट शक्यता आहे. कॉग्रसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे विद्यमान सत्ताधारी मनोहर शिंदे यांना पराभूत करण्यासाठी भाजपचे अतुल भोसले यांनी मोट बांधणी सुरू केली आहे. त्यामुले कालावधी लोटेल तसा इलेक्शन फिव्हर एन थंडीत कडक्याचा वाढणार आहे. 

येथील पालिकेच्या निवडणूकिसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा पहिला टप्पा पार पडला. यावेळी मोठ्या राजकीय गटाचे स्थानिक राजकीय कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. आरक्षणात काही राजकिय मातब्बरांना संधी मिळाली तर काहींवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. प्रभाग सोडून जाणाऱ्यांना उपरा सदस्य म्हणून तेथील राजकीय वातावरण फिरण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना व आरक्षणानंतर राजकिय गोटात उत्साह दिसतो आहे. त्यामुळे इच्छूकांनी उमेदवारीसाठी मोट बांदणी सुरू केली आहे. आरक्षण सोडतीत विद्यमान नगरसेवकांसह प्रबळ दावेदारांना अपेक्षित आरक्षण पडल्याने नाराजी व्यक्त होत होती. आरक्षण सोडतीनंतर पालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुक तयारीला लागले आहेत. काँग्रेस व भाजप यांच्यात सरळ लढत हेणार आहे. त्यात आमदार बाळासाहेब पाटील यांचा गट, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर गट, शेतिमित्र अशोकराव थोरात, स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवलेले सुहास कदमसह शिवसेना, मनसेसह यांच्या भुमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. प्रत्येक गटाचे आस्तित्व दाखवणारी निवडणूक आहे. प्रभाग आरक्षणाने निवडणुक संघर्षाची ठिणगी पडली आहे. 

विद्यमानमध्ये यांना पुन्हा संधी
विद्यमान उपाध्यक्ष मनोहर शिंदे, राजेंद्र यादव, शंकरराव चांदे, लक्ष्मण येडगे, उमा प्रमोद शिंदे, यमुना घाडगे, कल्पना नारायण रैनाक, नुरजहाँ मुल्ला, सुनिता पोळ, रत्नमाला काळे हे पुन्हा नशीब आजमावू शकतात.

यांना आहे, प्रभागांचा पर्याय
हणमंतराव जाधव यांच्या प्रभागात सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. दोन प्रभागात व माजी नगराध्यक्षा शारदा खिलारे प्रभाग क्रमांक सात मध्ये दावा करू शकतात. प्रकाश बागल यांची अडचण झाली आहे. मात्र कुटूंबातील सदस्य दावा करू शकतात. सुनिता साठे, वनिता लाखे, गजेंद्र बुधावले यांच्या प्रभागातील आरक्षणे बदलली आहेत. स्विकृत नगरसेवकपद भुषवलेले मोहन शिंगाडे, मोतीराम शेवाळे यांनाही संधी आहे. 

राजकिय मातब्बरांनाही संधी
अशोकराव थोरात यांच्या कुटूंबातील सदस्याला संधी मिळू शकते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन काशिद, मनसेचे दादा शिंगण, अरूण यादव यांना संधी आहे. भाजपाचे शहराध्यक्ष सुरज शेवाळे यांच्या कुटूंबातील महिलेला संधी मिळू शकते. यासह अनेक इच्छुकांचा निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. स्वबळाचा नारा देणारे सुहास कदम यांना स्वतःसाठी प्रभाग शोधावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT