congress-ncp-shivsena esakal
पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेस-भाजपची टक्कर; राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने चुरशीची लढत

तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनवल्यामुळे आणखी रंगत वाढली.

संतोष कणसे

तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनवल्यामुळे आणखी रंगत वाढली.

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी काँग्रेस, भाजप यांच्यात काट्याची टक्कर झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने एन्ट्री केल्याने लढत चुरशीची झाली. तर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनवल्यामुळे आणखी रंगत वाढली. निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रत्येक प्रभागात आकडेमोड सुरू झाली आहे. विजयी कोण ? याबाबत कार्यकर्त्यांच्या पैजा लागल्या आहेत.

कडेगाव शहर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आतापर्यंत येथे काँग्रेसला अपवाद वगळता सातत्याने यश मिळत गेले. काँग्रेसनंतर येथे भाजपची ताकद आहे. त्यामुळे येथे काँग्रेस व भाजप या प्रतिस्पर्ध्यातच दुरंगी लढती झाल्या. १३ जागांसाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीत तिरंगी लढत झाली. सत्ता कायम ठेवण्यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम तर सत्ता आपल्याकडे खेचून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड यांनी कडेगावात तळ ठोकला होता.

राष्ट्रवादीने तिसरा पर्याय दिल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार झाली. चुरस वाढल्याने तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सर्व प्रभागांतील घर न घर पिंजून काढले. निवडणूक ही अटीतटीची झाल्याने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून आपणच बाजी मारणार असा दावा केला जात आहे. पहिल्यांदाच निवडणूक मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादीनेही चमत्कार घडवणार असल्याचा दावा केला आहे. निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आकडेमोड सुरू केली आहे. विजयी कोण ? यावरून पैजाही लागल्या आहेत. निकाल लागेपर्यंत उमेदवारांत मात्र धाकधूक राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi News: विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण तापलं! राहुल गांधींनी सरकारला घेरलं; ठेवल्या तीन ठोस मागण्या, पण कोणत्या?

New Cricket Rules: मुद्दाम नो-बॉल टाकला, तर बॉलर मॅचमधून बाहेर! BCCI लागू करणार असलेल्या नव्या नियमांबद्दल घ्या जाणून

शरद पवार पंतप्रधान मोदींना का भेटले? अखेर कारण आलं समोर; दोन पानी पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Japanese Eating Habit: २० टक्के पोट रिकामे ठेवून दीर्घायुष्य? काय आहे जपानची 'हारा हाची बू' पद्धत ?

Donald Trump Tariff: ट्रम्प यांचा नवा ‘टॅरिफ बॉम्ब’! जेनेरिक औषधांवर २०० टक्के टॅरिफ; भारतावर मोठा परिणाम?

SCROLL FOR NEXT