Congress councilor of Shrigonda are in BJP 
पश्चिम महाराष्ट्र

श्रीगोंद्यातील कॉंग्रेस आघाडीचे नगरसेवक भाजपात डेरेदाखल

संजय आ. काटे

श्रीगोंदे (नगर) : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नऊ महिन्यांपूर्वी भाजपातून कॉंग्रेसमध्ये गेलेले तत्कालीन नगराध्यक्ष मनोहर पोटे आज त्यांच्या नगराध्यक्ष पत्नी शुभांगी पोटे यांच्यासह पुन्हा भाजपात डेरेदाखल झाले. दोन नगरसेवक वगळता इतर सगळेच भाजपात दाखल झाल्याने नगरपालिकेवर पुन्हा एकदा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.


कॉंग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांनी काल कॉंग्रेस पक्ष सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तोच कित्ता गिरवत आज नगराध्यक्ष शुभांगी पोटे त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे व इतर सहा नगरसेवकांनी पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे चार व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे या प्रवेशाने तालुक्‍यातील कॉंग्रेस पुरती संपल्यात जमा झाली आहे.

अलिकडेच नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी पोटे यांनी पाचपुते यांना सोडून ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्यासमवेत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांच्या व पाचपुते गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे वाद झाले होते. निवडणुकीतही प्रचाराची पातळी घसरली होती.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र, सगळे झाले गेले सगळे विसरून आज पोटे व पाचपुते समर्थकांची गळाभेट झाली. भाजप सोडताना पोटे यांनी नेते ठरवलेले भोस यांनाही सोडून देत पुन्हा भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT