Congress leader Rahul Gandhi esakal
पश्चिम महाराष्ट्र

राहुल गांधींची प. महाराष्ट्रात राजकीय मशागत; सांगलीनंतर एकाच महिन्यात कोल्हापूर दौरा, नेमकं काय घडणार?

Congress leader Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीला पर्यायने काँग्रेसला चांगले यश मिळाले.

सुनील पाटील

महाराष्ट्रात राजकीय मशागत केल्याशिवाय पर्याय नसल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही लक्षात आल्याचे राजकीय गोटातून सांगण्यात येत आहे.

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. त्यात मागील काही वर्षांत काँग्रेसचा (Congress) जनाधार कमी झालेल्या पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. सांगली लोकसभा मतदारसंघातही काँग्रेस बंडखोर आणि सध्या काँग्रेससोबत किंबहुना काँग्रेसमध्येच असणाऱ्या विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसने त्यातही लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आपल्या सत्तेचा मार्ग प्रशस्त करत आहेत. यातच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेपासून देशातील सर्व सामान्य नागरिक आणि तरुणांवर सकारात्मक छाप पाडण्यात यशस्वी ठरत आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून गांधी यांना कोल्हापूर-सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्याला भेट देता आली नाही.

तरीही भारत जोडा यांत्रा नांदेड येथे आल्यानंतर कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षातीलही काही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीला पर्यायने काँग्रेसला चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचाच डंका वाजला पाहिजे. त्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सर्वच नेत्यांना महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात पोहोचायचे आहेत.

याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रापासून करावी लागणार आहे. महाराष्ट्रात राजकीय मशागत केल्याशिवाय पर्याय नसल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही लक्षात आल्याचे राजकीय गोटातून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी शुक्रवार (ता. ४) आणि शनिवार (ता. ५) दोन दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह आहे.

घटक पक्ष म्हणून ठाम...

जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून आमदार सतेज पाटील यांनीही सर्वच घटक पक्षांचीही चांगली मोट बांधल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला येवढ्याच जागा हव्यात असे न म्हणता ज्या तालुक्यात ज्या पक्षाची ताकद आहे, त्या पक्षालाच जागा मिळू शकते. यावर घटक पक्ष म्हणून आम्ही ठाम असल्याचे वारंवार सतेज पाटील सांगत आहेत. यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीमधील जागा वाटपावरून चढाओढ सुरू आहे. वाद आहेत, असे दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: पावसामुळे उद्या शाळांना सुट्ट्या; ठाणे, कल्याणमध्ये सुट्टी जाहीर, मुंबईचं काय?

AI Project Revive : आता मृत प्रियजनांशी साधता येणार संवाद , AI ची कमाल, तंत्रज्ञानाबाबत ऐकून वाटेल आश्चर्य

Heavy Rainfall: निसर्ग कोपला, बळीराजाच्या डोळ्यात पाणी; पिकांच्या जागी साचला गाळ, नद्या नाले फुगले

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरची डोकेदुखी तीन खेळाडूंमुळे वाढली, एका जागेसाठी चुरस रंगली! पुन्हा एकदा ऑलराऊंडर बाजी मारणार?

Weekly Love Horoscope : शुक्र-बुध ग्रहाची युती! 'या' 3 राशींच्या लोकात वाढेल प्रेम अन् 'या' 2 राशींच्या नात्याला त्रास

SCROLL FOR NEXT