solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha2019 : सोलापूर काँग्रेसच्या गोटात 'आशेचा किरण'

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेना आशेचा किरण दिसू लागला आहे. या दौऱ्याचा फायदा घेत लोकसभा निवडणुकीत यश कसे संपादन करायचे हे सर्वस्वी योग्य नियोजनावर अवलंबून आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा झाला. या दौऱ्यात झालेली जाहीर सभा आणि मेळाव्याला झालेली गर्दी पाहता शिंदेंना आशेचा किरण दिसू लागला आहे. एकीकडे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी गटतट विसरून एका छताखाली आलेली आंबेडकरी जनता आणि दुसरीकडे मतदान होण्याआधीच विजयाचा संकल्प मेळावा घेतलेले भाजपचे नेते यामुळे कांग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. 

पवार यांनी जाहीरसभेदरम्यान मोदी सरकारचे काढलेले वाभाडे त्याचवेळी गांधी घराण्याचा त्याग सांगत उपस्थितांकडून वाहवा मिळवली. सत्ता असतानाही अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाचे हितच पाहिले, त्याचवेळी मोदी मात्र देशाचे नुकसान करीत आहेत हे मुद्दे पवार यांनी पुराव्यासह मांडले. यंत्रमागधारकांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, त्यामुळे यंत्रमागधारकांत एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे. त्याचीच धास्ती घेऊन भाजपनेही वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी यंत्रमागधारकांबाबत चर्चा ठेवली आहे, हे पाहता शिंदेंची एक एक चाल यशस्वी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पूर्व भागातील यंत्रमागधारक 
आणि उद्योगाबाबत जितकी जाण पवार आणि शिंदे यांच्याकडे आहे, तितकी विद्यमान सत्ताधाऱ्यांकडे नाही. यंत्रमाग धारकांच्या बैठकीत डॅा.जयसिद्धेश्वर स्वामी काय बोलतात याबाबत उत्सुकता असणार आहे. 

एमआयएममुळे निश्चित असलेल्या अॅड. प्रकाश आंबेडकरांना माकपच्या नरसय्या आडम यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे पवार दौऱ्यादरम्यान मिळालेली सहानुभुती कायम ठेवण्यासाठी शिंदेंना नियोजन करावे लागणार आहे. गत विधानसभा निवडणुकीत आडम यांची डिपॅाजिट जप्त झाली असली तरी त्यांची स्वतःची व्होट बॅंक आहे. त्यामुळे त्याचा फटका काही प्रमाणात शिंदेंना बसण्याची शक्यता आहे. 

मतांच्या ध्रुवीकरणाच्या फायद्याची शक्यता
भाजपचे उमेदवार डॅा. जयसिद्धेश्वर स्वामी आणि बहुजन वंचित आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात मतांचे ध्रुवीकरण होत आहे. ठराविक समाजाचा पाठिंबा या दोघांना मिळत आहे, अशा स्थितीत उर्वरीत समाजाचा भक्कम पाठिंबा मिळवण्यात शिंदे यशस्वी झाले, तर त्याचा चांगला फायदा मिळू शकतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT