karad 
पश्चिम महाराष्ट्र

पृथ्वीराज चव्हाणांचा गड आणखी मजबूत, भाजप पराभूत

सचिन शिंदे

कऱ्हाड : अटीतटीच्या झालेल्या तालुक्यातील मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत भाजपवर मात करत काँग्रेसच्या पॅनेलने विजय खेचून आणला. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवली होती. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आगामी विधानसभेपूर्वी धक्का देण्याच्या दृष्टीने भाजपतर्फे विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने उतरली होती. मात्र प्रत्यक्षात भाजपला पाचच जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने नगराध्यक्षपदासही 14 जागांवर विजय मिळवत सत्ता प्रस्थापित केली.

काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निलम येडगे यांनी 270 मतांनी विजय मिळवत भाजपच्या डॉ. सारीका गावडे यांचा पराभव केला. येडगे यांना 7747 तर गावडे यांना 7477 मते मिळाली. त्याशिवाय नऊ प्रभागातील प्रभाग क्रमांक एक, तीन, चार, सहा व नऊमध्ये काँग्रेसचे उमेदावर विजयी झाले. भाजपने प्रभाग क्रमांक दोन, व आठमध्ये विजय मिळवला. त्यात प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक उमेदवार काँग्रेसचा तर एक भाजपचा विजयी झाला. त्यामुळे भाजपचे पाच तर काँग्रेसचे 14 उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक चारमध्ये काँग्रेसच्या भारती पाटील व भाजपच्या अवंतिका घाडगे यांना 662 अशी समान मते मिळाली. त्यांचा निकाल चिठ्ठीव्दारे जाहीर करण्यात आला.

निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी त्या दोघींच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून त्या बॉक्समध्ये टाकल्या. चार वर्षांची लहान मुलगी आराध्या जाधवतर्फे एक चिठ्ठी उघडण्यात आली. ती चिठ्ठी भारती पाटील यांच्या नावाची होती. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. विजय अपेक्षित होता. मात्र आम्ही थोडे कमी पडलो, त्यामुळे पूर्ण यश मिळवता आले नाही, असे काँग्रेसच्या पॅनेलचे नेते मनोहर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या केलेली आघाडी महत्वाची ठरली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: दिवाळीतही मेगाब्लॉकची अडचण! लोकलसह अनेक गाड्यांवर परिणाम; प्रवाशांचा होणार खोळंबा

Gold Price on Dhanteras: धनत्रयोदशीच्या आधी सोनं 3,200 रुपयांनी महागलं; तर चांदी 7 हजारांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : अमरावतीत सोनेरी भोगची चर्चा! २४ कॅरेट वर्खाने सजलेली ₹21 हजार किलोची मिठाई आकर्षणाचे केंद्र

Hasan Mushrif : सासऱ्यांनी सुरू केलेल्या डिबेंचरविरोधात सुनेचा मोर्चा, ढोंगी माणसांना लोक ओळखून, हसन मुश्रीफांचा कोणावर रोख...

Minister Dattatreya Bharane: राज्यात रब्बी हंगाम क्षेत्रात होणार वाढ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; पाणी टंचाई जाणवणार नाही

SCROLL FOR NEXT