Construction of five nallas from district "planning"; earlier proposal of Chaitrabhan-Arwade Park canceled 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा "नियोजन' मधून पाच नाल्यांची बांधकामे; चैत्रबन-आरवाडे पार्कचा आधीचा प्रस्ताव रद्द

जयसिंग कुंभार

सांगली ः जिल्हा नियोजन समितीच्या सात कोटींच्या निधीतून महापालिका क्षेत्रातील पाच वेगवेगळ्या पाच नाल्यांची कामे करण्याचा निर्णय आज स्थायी समितीने घेतला. स्थायी समितीच्या सदस्यांनी आज चैत्रबन ते आरवाडे पार्कपर्यंतच्या नाल्याच्या बांधकामासाठी दहा कोटीला मान्यता देण्यास विषय रद्द केला. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद यापुढेही पेटतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. सभापती पांडुरंग कोरे अध्यक्षस्थानी होते. 


हा दहा कोटींचा निधी 14 व्या वित्त आयोगातून मंजूर आहे. वित्त आयोगाचा 33 कोटींचा निधी आला होता. त्यातून दहा कोटींचे नाले बांधकाम करण्याचा प्रस्ताव कॉंग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी आयुक्तांमार्फत शासनाकडून संमती मिळवली होती. गेल्या सभेत चैत्रबन ते आरवाडे पार्कच्या कामाला मंजुरीचा विषयावर अंतर्गत धुसपूस सुरू होती. संतोष पाटील यांच्याविरोधात सर्वांचा रोष होता. 


या प्रस्तावित कामांत स्थायी समितीच्या सदस्यांची प्रत्येकी 15 लाखांची कामे नसल्याने सदस्य नाराज झाले होते. आज त्याचे पडसाद उमटले. एकाच ठिकाणी हा निधी का ? असा सवाल सर्वांनी केला. या एकाच प्रस्तावापेक्षा इतरांच्या प्रभागातील नाल्यांची बांधकामेही करा, अशी मागणी सभेत करण्यात आली. 
विजयनगर नाला, कुपवाड बजरंगनगर ते भारत सूतगिरणीपर्यंतचा नाला, कुपवाड येथील कैकाडी स्मशानभूमी ते यल्लमा मंदिर, भीमनगर झोपडपट्टी ते मीरा हौसिंग सोसायटी व रेल्वे गेट ते ईदगाहपर्यंतच्या या पाच नाल्यांची बांधकाम करावेत, अशी मागणी सदस्य गजानन मगदूम, सविता मदने, अनारकली कुरणे, शेडजी मोहिते, पद्मश्री पाटील यांनी केली. 
सभापतींनी शासन आदेशात काय म्हटले आहे याचा खुलासा करावा, असे आदेश दिले.

शासनाने दहा कोटीच्या निधी खर्चास परवानगी दिली आहे. मात्र तो कोठे खर्च करावा यासाठी स्पष्ट निर्देश नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदस्यांनी सूचवलेल्या पाच नाल्यांचे बांधकामा अंदाजपत्रक करून पुढील सभेत सादर करा, असे आदेश त्यांनी दिले. त्यांनी आधीचा चैत्रबन ते आरवाडे पार्कपर्यंतचा नाला बांधकामाचा प्रस्ताव रद्दचे आदेशही दिले. त्याला सर्वांनी मंजुरी दिली. 

बरखास्तीची भीती दाखवू नका : कोरे 
भाजपचे दोन्ही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहर विकासासाठी कटीबध्द आहोत. त्यांच्यामुळेच शंभर कोटींचा निधी मिळाला, आम्ही हा निधी दुजाभाव न करता सर्वांना दिला. एकाच नाल्यावर दहा कोटी खर्च करण्यासाठीचा दबाव आम्ही झुगारून दिला. स्थायी समिती बरखास्तीची आम्हाला भीती दाखवू नका. तो अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा प्रतिहल्ला स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांनी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर केला. 
संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT