पश्चिम महाराष्ट्र

बिचुकलेचे तोंड आवरावे : न्यायालयात मागणी

सिद्धार्थ लाटकर

सातारा : बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले याच्यावरील खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला. सात वर्षांपूर्वी आरोपींवर गुन्हा नोंद झाला. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या. वेळोवेळी त्याच्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्याने पोलिस ठाण्याला येऊन फिर्याद नोंदविल्या. बिचुकलेचे तोंड आवरावे, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली.

बिचुकले याने लोकसभा निवडणूक लढविली. या काळात आरोपीस पोलिस संरक्षण होते. तरीही त्यास या प्रकरणाचे वॉरंट बजवाले नाही अथवा ताब्यातही घेतले नाही. आरोपी आजही सातारा शहरात फिरत असतो. त्यामुळे तो फरारी होता हे पोलिसांचे म्हणणे चुकीचे ठरत आहे. तरी आरोपीस जामीन द्यावा, असा युक्तिवाद ऍड.शिवराज धनवडे यांनी केला. दरम्यान, सरकारी पक्षातर्फे ऍड मिलिंद ओक म्हणाले, आरोपी हा कलाकार असून एका मालिकेत सध्या तो स्पर्धक आहे. त्याच्या करिअरचा विचार करून त्यास अटी शर्थीवर जामीन देण्यास हरकत नाही.

तसेच त्याने संबधित मालिकेत स्पर्धक म्हणून खेळताना न्याय व्यवस्था, पोलिस प्रशासन व चालू असलेल्या प्रकरणांवर कोणतेही भाष्य करू नये, ही निर्बंध ठेवावेत. युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायालयात नागरिकांची गर्दी झाली होती. सायंकाळी साडेपाच वाजता जामीन अर्जावर निकाल होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्रात अजूनही सगळ्यात मागे

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT