corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कडेगावात 56 वर्षीय कंडक्टरला कोरोना...शहरात भीतीचे वातावरण... तीन व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात

सकाळवृत्तसेवा

कडेगाव (सांगली)- येथे मुंबई ठाणे येथून आलेल्या 56 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ते ठाणे येथे कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. अखेर शहरांत कोरोनाने शिरकाव केल्याने नागरिकांत भीती वातावरण असून प्रशासनाने संपूर्ण गणेशनगर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तर आरोग्य विभागाने संबंधित कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कातील त्यांची पत्नी,मुलगा व मुलगी यांना संस्थात्मक क्वारंनटाईन केले आहे. तर तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या आता 27 वर पोहोचली आहे.

संबंधित 56 वर्षीय कोरोना बाधीत व्यक्ती मुंबई ठाणे येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून ते मुंबई येथे एकटेच राहत होते.तर त्यांची पत्नी,मुलगा व मुलगी हे तिघे शहरांतील गणेशनगर येथे राहतात.त्यामुळे संबंधित कोरोना बाधीत व्यक्ती ही मंगळवारी (ता.30) मुंबई ठाणे येथून शासकीय परवाना काढून कडेगाव येथे आपल्या घरी कुटुंबियांकडे आले होते.याबाबत आरोग्य विभागाला माहिती मिळताच आरोग्य विभागाने त्यांना होमक्वारंनटाईन केले होते.तसेच शुक्रवारी (ता.3) त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेतले होते.त्याचा रिपोर्ट आज दुपारी दोन वाजता प्राप्त झाला असून त्यामध्ये संबंधित 56 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने समजताच प्रांताधिकारी गणेश मरकड,तहसीलदार डॉ.शैलजा पाटील,तालुका आरोग्य अधिकारी माधव ठाकूर,पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी तात्काळ गणेशनगर येथे भेट देऊन उपाय योजना केल्या.
संपूर्ण गणेशनगर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले असून येथील सर्व रस्ते सील केले आहेत.तसेच येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
तर आरोग्य विभागाने संबंधित कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कातील त्यांची पत्नी,मुलगा व मुलगी यांना संस्थात्मक क्वारंनटाईन केले असून त्यांना येथील एमआयडीसीतील अलगीकरण कक्षात दाखल केले आहे.तर संबंधित 56 वर्षीय कोरोनाबाधीत व्यक्तीला उपचारासाठी मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल केले. 
तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही सुरु केले आहे.तर नगरपंचायतीच्यावतीने शहरात रोगप्रतिबंधक औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT