dispute.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

"कोरोना' मुळे तुटणारे संसार  वाचवण्यासाठी घ्या ऑनलाईन सल्ला ! 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' मुळे "लॉक डाऊन' आणि संचारबंदी केल्यामुळे अनेक कुटुंबे घरातच बंदीस्त झाली आहेत. अनेकांना कुटुंबाला मोकळा वेळ द्यायला मिळाला आहे. तर जास्त काळ एकत्र आल्यामुळे एकमेकातील उणिवांची जाणीव होऊन काहींचे खटके उडत आहेत. चीनपासून भारतात गल्लीबोळातील घरात हे चित्र पहायला मिळत आहे. "लॉक डाऊन' मुळे कोरोनाचा प्रसार रोखला जात असला तरी कौटुंबिक वाद वाढत जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संसार वाचवण्यासाठी सांगलीतील पुरूष हक्क संरक्षण समितीने ऑनलाईन सल्लामसलत सुरू केली आहे. तसेच फेसबुक पेजही ओपन केले आहे. 


सकाळपासून रात्री उशिरापर्यंतची धावपळ...काम..काम आणि फक्त काम यामध्ये गुरफटलेल्या नोकरदार, कामगारापासून उद्योजक, व्यापारी, दुकानदार आदींना "कोरोना' ने सक्तीने विश्रांती घ्यायला लावले आहे. कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत "लॉक डाऊन' केले आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता रस्त्यावर फिरण्यास मनाई करत संचारबंदी लागू केली आहे. घरातच सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सकाळी भाजीपाला, दूध आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठीचा वेळ सोडला तर दिवसभर घरातच अडकून पडावे लागत आहे. त्यावरून सोशल मिडियावर अनेक गंमतीशीर "पोस्ट' फिरू लागल्या आहेत. टीव्ही, मोबाईल, कौटुंबिक कामे आणि कुटुंबाशी संवाद या व्यतीरिक्त अनेकांना कोणतेच काम राहिले आहे. 


"कोरोना' मुळे दुर्दैवाने कुटुंबांना बंदिस्त राहावे लागत आहे. यानिमित्ताने अधिक वेळ देता येत असला तरी काही कुटुंबामध्ये जास्त काळच्या सहवासातून एकमेकाच्या उणीवा दिसू लागल्या आहेत. पती-पत्नी, सासू-सून, नणंद-भावजय यांच्यात खटके उडू लागलेत. चीनसह अनेक देशात कौटुंबिक वाद वाढत चालल्याचे एका निष्कर्षातून समोर आले आहे. भारतात देखील "लॉक डाऊन' नंतर न्यायालयात कौटुंबिक खटले दाखल होण्याची शक्‍यता वर्तवली जाते. संचारबंदीमुळे दैनंदिन गुन्हे थांबले असून घरगुती वादाचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा कुटुंबातील व्यक्तीमधील संघर्ष वेळीच टाळला जाऊन त्यांच्यात सुसंवाद आणि स्नेह निर्माण करण्याची आवश्‍यकता आहे. ही सामाजिक गरज ओळखून सांगलीतील पुरूष हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब पाटील यांनी कौटुंबिक विवाद निवारणासाठी ऑनलाईन सल्लामसलत सुरू केली आहे. तसेच www.facebook.com/phss,sangli हे फेसबुक पेज सुरू केले आहे. 
 

""लॉक डाऊन झाल्यानंतर कौटुंबिक खटले दाखल होण्याची शक्‍यता आहे. संसार तुटू नयेत यासाठी वेळीच समुपदेशनाची गरज आहे. त्यामुळे ऑनलाईन सल्लामसलत आणि फेसबुक पेज सुरू केले आहे.'' 
-ऍड. बाळासाहेब पाटील (सांगली) 
.............. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT