corona count increased effect on transport of maharashtra in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लालपरीला ठरतोय घातक ; प्रवासी संख्येत घट

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) : हळूहळू पूर्वपदावर येत असलेली लाल परी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आठ दिवस कोरोनाचा वाढत्या आलेखामुळे शासनाने धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मोठमोठ्या यात्रा, समारंभाना बंदी घातल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे प्रवासी संख्येत लक्षनीय घट झाली आहे. त्याचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसत आहे. 

इस्लामपूर आगाराचे नियमित दिवसाकाठी उत्पन्न नऊ लाखांपर्यंत होते. कोरोनाच्या कालावधीत काही काळ हे उत्पन्न पूर्णपणे बंद होते. हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर यायला सुरवात झाली होती. आगाराचे उत्पन्न सहा ते सात लाखांपर्यंत वाढले. परंतु कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले आहे. त्यामुळे शासनाने काही गोष्टीवर निर्बंध आणले.

मोठमोठी धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद केलीत. प्रवासीच बाहेर न पडल्याने त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळावर झाला. आजरोजी इस्लामपूर आगाराचे दिवसाकाठी उत्पन्न चार ते पाच लाखांपर्यंत खाली आले आहे. एस टी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. 

"कोरोनाच्या मोठ्या संकटातून बाहेर पडून पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु पुन्हा प्रसार माध्यमाद्वारे कोरोनाची वाढती अवस्था पाहता नागरिकांच्यावर त्याचा परिणाम होऊन प्रवासी प्रवास करणे टाळू लागले आहेत. कोरोना प्रतिबंध सर्व काळजीनिशी निरजंतूक एसटी बसेस सुरू आहेत. घाबरून न जाता प्रवाशांनी एसटी बसमधूनच सुरक्षित प्रवास करावा."

- शर्मिष्ठा घोलप-पाटील, आगार व्यवस्थापक, इस्लामपूर आगार 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: कर्मा रिपीट्स... मनोज जरांगे खूप महागात पडेल, धनंजय मुंडेंनी दिला इशारा! CBI चौकशीची मागणी

Stray Dogs Case: महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर भटके श्वान आणि प्राण्यांना प्रवेशबंदी! सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश

Dombivli Traffic: शहरातील कोंडी फुटणार! मोठागाव रेल्वे फाटकावरील प्रकल्पात मोठा बदल; काय असेल नवा प्लॅन?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत 44 कोटीचा डांबर घोटाळा

"हा सिनेमा चालणार नाही" माहेरची साडी सिनेमा पाहिल्यावर दादा कोंडकेनी पुतण्याला घेतलेलं फैलावर ; म्हणाले..

SCROLL FOR NEXT