Corona effect on Dividends & rebate; distribution stopped due to lack of annual meeting 
पश्चिम महाराष्ट्र

लाभांश, रिबेटला कोरोनाचा फटका, वार्षिक सभा नसल्याने वाटप थांबले

शामराव गावडे

नवेखेड (जि . सांगली ) : कोरोना महामारीचा फटका सर्व क्षेत्राला बसला आहे. जिल्ह्यात मजबूत असलेले सहकार क्षेत्रही यातून सुटले नाही. जिल्ह्यात तीन हजारांहून सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा यामुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे नफा विभागणी व लाभांश वाटपही थांबले आहे. 

जिल्ह्याच्या अर्थकारणाचा सहकार केंद्रबिंदू. लोकांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या सहकारी संस्थांमध्ये शंभरी पूर्ण केलेल्या अनेक सेवा सोसायट्यांचा समावेश आहे. 31 मार्चला संस्थांचे आर्थिक वर्ष संपते. त्यानंतर लेखापरीक्षण व ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये संस्थांच्या वार्षिक सभा होतात. अनेक संस्थांच्या सभा वादळी होतात, गाजतात. यात सभासदांच्या कळीचा मुद्दा म्हणजे नफा विभागणी. संस्थेला झालेल्या नफ्याची विविध प्रकारच्या तरतुदी करून नफा वाटणी केली जाते. या नफा वाटणीला कायद्याप्रमाणे सर्व साधारण सभेची मंजुरी आवश्‍यक असते. प्रत्येक सभासदाच्या शेअर्सप्रमाणे 5 पासून 12 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत शेअर्सनुसार सभासदांना लाभांश वाटप केले जाते. साधारणपणे दसरा दिवाळी या सणाचे औचित्य साधून या लाभांशचे वाटप होते. सणासुदीच्या काळात अनेकांना लाभांश आधार ठरतो. 

कोरोना स्थिती व नियमात अडकल्याने सहकार क्षेत्र अडचणीत आले. वार्षिक सभा झाल्या नाहीत. कोरोना प्रसार रोखण्यासाठी लोकांना एकत्र करू नये, असा आदेश असल्याने सर्व ठप्प आहे. यावर मार्ग काढून लाभांश वाटप व्हावे, अशी मागणी सहकारी संस्थांच्या सभासदांमधून होत आहे. 

दृष्टिक्षेपात सहकारी क्षेत्र 

  • मध्यवर्ती बॅंक 1 
  • विकास सोसायट्या 767 
  • प्राथमिक बिगर शेती पतपुरवठा संस्था 1131 
  • पणन संस्था 45 
  • प्रक्रिया उत्पादक (साखर कारखाने व इतर) 421 
  • दूध संस्था 572 
  • कोट 

सध्या तरी पर्याय नाही

कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा घेऊ नयेत, असे आदेश आहेत. त्यामुळे सभांना परवानगी नाही. सध्या तरी कोणताही पर्याय निघालेला नाही. 
- निळकंठ करे, जिल्हा निबंधक सहकारी संस्था, सांगली 

नफा विभागणीला परवानगी द्यावी
सदस्यांच्या मासिक सभेत नफा विभागणीला परवानगी द्यावी. त्याचे निकष मात्र सहकार विभागाने तयार करून द्यावेत. 
- जयकर चव्हाण, अध्यक्ष, नवेखेड सर्व सेवा सोसायटी 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT