corona new logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

"कोरोना' मुक्त झालेल्या लक्ष्मीनगरच्या रूग्णाचा मृत्यू : जिल्ह्यात नांगोळे, जांभुळणी, मोहरेत रूग्ण आढळले...33 रूग्णांवर उपचार सुरू 

सकाळवृत्तसेवा

सांगली- जिल्ह्यात शनिवारी (ता.23) मध्यरात्रीपर्यंत आणखी सहा कोरोना बाधित रूग्ण आढळले. हे रूग्ण नांगोळे (ता. कवठेमहांकाळ), आष्टा (ता. वाळवा) येथील झोळंबी वसाहत, जांभुळणी (ता. आटपाडी), मोहरे (ता. शिराळा), धारावीतून आलेली 12 वर्षाची मुलगी आणि आटपाडीतील सोनारसिद्धनगर येथील हे रूग्ण आहेत. दरम्यान साखर कारखान्याजवळील लक्ष्मीनगर येथील 52 वर्षीय "कोरोना' बाधित रूग्णाचा अहवाल दोन दिवसापूर्वी "निगेटिव्ह' आला होता. परंतू इतर आजारामुळे मृत्यूशी झुंज देत असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. "कोरोना' तून वाचला आणि इतर आजारामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. 


जिल्ह्यात आतापर्यंत "कोरोना' बाधित रूग्ण 78 झाले आहेत. त्यापैकी 33 रूग्ण उपचारासाठी आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. तर निगेटिव्ह झालेले 43 रूग्ण आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 पर्यंत धारावीतील 12 वर्षाची मुलगी, आटपाडीतील सोनारसिद्धनगर येथील रूग्ण आणि आष्टा येथील रूग्ण असे तिघेजण पॉझिटीव्ह सापडले. तर मध्यरात्रीच्या सुमारास नांगोळे, जांभुळणी आणि मोहरे येथील आणखी तीन रूग्ण सापडले. 
साखर कारखान्याजवळील लक्ष्मीनगर येथील 52 वर्षीय रूग्ण 16 मे रोजी पॉझिटीव्ह सापडला होता. 22 रोजी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतू त्याला फुफ्फुसाचा टीबी असल्यामुळे प्रकृती चिंताजनक बनली होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास या रूग्णाचा मृत्यू झाला. 


दरम्यान विटा येथे मुंबईहून आलेल्या 72 वर्षीय वृद्धास न्युमोनिया झाल्यामुळे मिरज सिव्हीलमध्ये दाखल केले होते. आज पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्वॅबचा नमुना घेतला आहे. परंतू अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT