"Corona 'Helpline: Don't be afraid of colds, fever, coughs 
पश्चिम महाराष्ट्र

"कोरोना' हेल्पलाईन : सर्दी, ताप, खोकला आहे घाबरू नका

सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणे अनेकदा अडचणीचे होते. अशा स्थितीत त्यांना मदत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला सांगली आणि मिरज येथील आयएमएच्या वैद्यकीय व्यावसायिक आणि वरुण जैन यांची मदतीने आरोग्यविषयक समस्यांसाठी विशेषत: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणाऱ्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे. 

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील जनतेला आरोग्य विषयक समस्यांसाठी हेल्पलाईन उपलब्ध करून दिली आहे. आयएमए सांगलीचे अध्यक्ष डॉ. रणजितसिंह जाधव, डॉ. नितीन पाटील, आयएमए मिरजचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर, डॉ. चड्डा, डॉ. योगेश साळुंख, डॉ. रियाम मुजावर, डॉ. संजय कुरेशी, डॉ. अविनाश झळके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""कोविड-19 च्या अनुषंगाने सर्दी, ताप, खोकला अंगदुखी या प्रकारची लक्षणे असतील अशांनी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना तज्ज्ञ डॉक्‍टरांशी या हेल्पलाईन क्रमांकावरून थेट संपर्क करून देण्यात येईल. हे डॉक्‍टर्स रुग्णांशी बोलून त्यांचा कुठे प्रवास झाला आहे का किंवा काय लक्षणे आहेत हे तपासून आवश्‍यकतेनुसार सल्ला देतील. यामधून जर रुग्णांनी डॉक्‍टरांना प्रत्यक्ष भेटून सल्ला घेण्याची आवश्‍यकता दिसून आल्यास त्याप्रमाणे सल्ला देण्यात येइल. 

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या हेल्पलाईन क्रमांकाच्या सुविधेचा लाभ घ्यावा. तथापि, आरोग्याशी निगडित समस्यांसाठीच या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या अनुषंगाने किंवा अन्य कोणत्याही समस्यांसाठी आपत्ती निवारण कक्षाशी 0233-2600500, टोल फ्री क्रमांक 1077, मोबाईल क्रमांक 8208689681/9370333932 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT