corona patient angry in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

तो कोरोनाबाधित म्हणाला 'व्हिडीओ शूटींग थांबव नाही तर 'तुला मिठीच मारतो बघ अन्...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : 'व्हिडीओ शूटींग थांबव नाही तर मिठी मारतो बघ' अशी धमकीच बेळगाव शहरातील कोरोनाबाधीताने रविवारी दिली. शहरात रविवारी चार कोरोनाबाधीत सापडले. त्यांना रूग्णालयात नेण्यासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी रूग्णवाहीका घेवून गेले. त्यापैकी एकाने कोरोनाबाधीतांचे व्हीडीओ चित्रण सुरू केले. त्यामुळे कोरोनाबाधीतांपैकी एकजण संतापला व चित्रणाला आक्षेप घेतला.

चित्रण न थांबविल्यामुळे मग कोरोनाबाधीताने चक्क मिठी मारण्याचा इशारा दिला. पण या इशाऱ्यानंतरही पालिकेच्या कर्मचाऱ्याने चित्रण थांबविले नाही. ते व्हिडीओ चित्रण आता समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतांची नावे व ओळख गोपनिय ठेवण्याच्या नियमालाच हरताळ फासला गेला आहे. शहरात कोरोनाबाधीतांची संख्या कमी होती. पण महाराष्ट्रातून आलेल्यांमुळे शहरातही बाधीतांची संख्या वाढू लागली आहे. शहरात कोरोनाबाधीत सापडले की त्यांना बिम्समधील कोरोना उपचार कक्षात दाखल करणे, त्यांच्या प्रथम व दुय्यम संपर्कातील लोकांचे क्वारंटाईन करणे ही जबाबदारी महापालिकेकडे असते. त्यांच्यासोबत आरोग्य विभागाचे कर्मचारी व पोलिसही असतात.

वडगावातील ढोर गल्लीत रविवारी कोरोनाबाधीत आढळल्यानंतर महापालिकेचे पथक तेथे गेले होते. त्यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांने त्यांचे व्हिडीओ चित्रण सुरू केले. या कर्मचाऱ्यांना त्या बाधीतांना शिविगाळ केल्याचेही चित्रण पाहिल्यावर कळते. चित्रण सुरू होताच संबंधितांना त्याला आक्षेप घेतला. चित्रण बंद करण्याची विनंती आधी त्या कर्मचाऱ्याला करण्यात आली. पण तरीही त्या कर्मचाऱ्याने चित्रण न थांबविल्यामुळे मग तुला येवून मिठी मारू का रे? असा सवाल कोरोनाबाधीताने केला. त्यावर 'ये ना, काय फरक पडणार आहे' असे उर्मट उत्तर त्या कर्मचाऱ्याने दिले. 'व्हिडीओ काढायला त्याला मजा यायला लागली आहे' अशी उद्वीग्न प्रतिक्रिया मग त्या कोरोनाबाधीतांनी दिली.

शिवाय 'तू येवून मला मिठी मार' असे त्या कोरोना बाधीताने सांगीतले. चित्रीकरण सुरू असताना त्या कोरोनाबाधीतांबाबत आक्षोपार्ह विधाने पालिका कर्मचाऱ्याने केली आहेत. या प्रकाराला तेथे उपस्थित पालिकेच्या अधिकाऱ्यानी आक्षेप घेतला नाही विशेष. कोरोनाबाधीतांची नावे जाहीर केल्याप्रकरणी एप्रिल महिन्यात जिल्हाधिकाऱ्यानी एका व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. पण बाधीतांची नावे समाजमाध्यमांवर व्हायरल करणे, त्यांचे व्हिडीओ चित्रण करून ते व्हायरल करणे हा प्रकार सुरूच आहे.

वडगावातील कोरोनाबाधीतांचे चित्रण रविवारी दुपारपासूनच व्हायरल झाले आहे. बेळगावातील अनेकांनी ते चित्रण बघितले आहे. कोरोना काळात महापालिकेच्या यंत्रणेवर ताण आला आहे ही बाब खरी असली तरी गोपनियतेच्या नियमांचे उल्लंघन पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच होत आहे. हा प्रकार महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना कळला आहे. ते व्हिडीओ चित्रण आयुक्त के. एच. जगदीश याना दाखवून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची शिफारस केली जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake in Delhi: तब्बल १० सेकंद राजधानी हालली...दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये भूकंपाचे मोठे धक्के

Indian Womens Hockey: अनुभवी हॉकी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे घसरण : हरेंद्र सिंग

Horoscope Prediction Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला गजकेसरी अन् मालव्य राजयोग, मिथुनसह या राशींना धनलाभ आणि सुखाची प्राप्ती!

Stock Market Opening: सेन्सेक्सची 122 अंकांच्या वाढीसह सुरुवात; मेटल क्षेत्रात तेजी, कोणते शेअर्स घसरले?

Latest Maharashtra News Updates : आलमट्टी उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ भेटणार जलमंत्र्यांना

SCROLL FOR NEXT