पश्चिम महाराष्ट्र

Corona Updates: चिंताजनक! 24 तासांत सांगलीत कोरोना रुग्णांचा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात (sangli district) आज दुसऱ्या लाटेतील उच्चांकी २३२८ नवे रुग्ण आढळले. मंगळवारी १५६८ तर बुधवारी १८३३ रुग्ण आढळले होते. रोज शे दोनशेंनी रुग्ण वाढत आहेत. काल ५७ तर आज ५६ जणांचा मृत्यू झाला. आज जिल्ह्यातील ३८, परजिल्ह्यातील १८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या १ मार्चनंतर जिल्ह्यात कोरोनाने (covid-19)तोंड वर काढले आहे. त्यावेळी जिल्ह्यात २२ नवे रुग्ण सापडले होते. १० एप्रिलला ४११ नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर सुरु असलेली वाढ आता दिवसेंदिवस कायम आहे. आज तब्बल २३२८ नवे रुग्ण आढळले.

गतवर्षीच्या पहिल्या लाटेतील उच्चांक १२५८ रुग्णांचा होता. म्हणजे पहिल्या लाटेच्या तुलनेत रोज जवळपास दुपटीने रुग्ण वाढत आहेत. साधनसामुग्रीचा तुटवडा असून नागरिकांनी घरीच राहणे गरजेचे आहे. महापालिका (sangli munciple corporation) क्षेत्रात आज तब्बल ३१४ रुग्‍ण आढळले. परवा दिवशी १६७ रुग्ण आढळले होते. म्हणजे केवळ दोन दिवसात इथेही जवळपास दुपटीने संख्या वाढली आहे. आज सांगलीत १७५ तर मिरजेत १३९ रुग्ण आढळले. आता शहरातही गतीने रुग्ण वाढत आहेत. आजपासून जिल्हाव्यापी टाळेबंदी (lockdown) सुरु झाली आहे.

आज आरटीपीसीआर (RT-PCR) ३ हजार १५३ चाचण्यांमधून १२१४ रुग्ण आढळले. ४ हजार ४२१ अँटिजेन चाचण्यांमधून (antigen test) ११९२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. प्रति चाचण्यांमागे बाधितांचे प्रमाणही आता वाढत आहे. आजघडीला २४८५ रुग्णांची प्रकृती नाजूक आहे. जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंचा आकडा २५११ इतका झाला. मृतांचा दररोजचा आकडाही सरासरी पन्नासांवर गेला असून सलग चार दिवस ही स्थिती आहे. जिल्ह्यात १ मार्चला फक्त १६६ उपचारांखालील रुग्ण होते. आज घडीला ही संख्या १५ हजार ९०२ इतकी झाली.

तालुकानिहाय रुग्ण (कंसात मृतांची संख्या)

आटपाडी - २०८ (०), कडेगाव - २१५ (१), खानापूर - २४३ (३), पलूस - ११९ (४), तासगाव - २५८ (४), जत - २५६ (४), कवठेमहांकाळ - १५५ (१), मिरज - ३०७ (३ ), शिराळा - ६६ (१), वाळवा - १८७ (६), मनपा - ३१४ (१२)

सांगली जिल्ह्यातील चित्र -

  • जिल्ह्यात आज ११३४ जण कोरोनामुक्त

  • जिल्ह्यात आज १३ हजार ७८२ जणांचे लसीकरण

  • महापालिका क्षेत्रात ३१४ नवे रुग्ण, सांगलीत १७५, मिरजेत १३९

  • उपचारांखालील रुग्ण- १५९०२

  • गृहअलगीकरणातील रुग्ण- १२६६६

  • आजअखेरचे बरे- ६७२३४

  • जिल्ह्यातील ३८ तर परजिल्ह्यातील १८ जणांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT