पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात कोरोनाचा विस्फोट; जिल्ह्यात 24 तासात 1604 बाधित

कोरोना कहर कायम; तालुक्यात सर्वाधिक ४४३

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात (belgam district) कोरोनाचा कहर कायम आहे. आरोग्य विभागातील (helath department) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत जिल्ह्यामध्ये तब्बल १,६०४ रुग्ण आढळले आहेत. यात ६१ बेळगाव शहर आणि ३९२ बेळगाव तालुक्यातील रुग्ण आहेत. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या मिडिया बुलेटीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या ८४३ असल्याचा उल्लेख आहे. तर, ३६७ जणांनी कोरोनावर (covid-19) मात केली आहे.

बेळगाव शहर आणि जिल्ह्यात बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ सुरु आहे. पण, आज बाधितांच्या आकड्याचा विस्फोट झाला आहे. तब्बल १ हजार ६०४ जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. बाधितांची संख्या सतत वाढत असताना दुसरीकडे मृतांची संख्याही वाढू लागली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी कोरोना कर्फ्यू (corona curfew) आणि निर्बंध जारी झाले आहे. तरीही बाधितांचे आकडे वाढत आहेत.

मिडिया बुलेटीननुसार (media bulletine) ८४३ बाधितांमध्ये अथणी तालुका २४, बेळगाव ३९५, बैलहोंगल ५३, चिक्कोडी २४, गोकाक १२२, हुक्केरी २१, खानापूर ३८, रामदुर्ग ६४, रायबाग ४४, सौदत्ती ४५ आणि इतर ठिकाणी १३ मिळून ८४३ रुग्ण आढळून आले आहेत. तर ६६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा वाढून ३६८ झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६ हजार ३३६ जण कोरोना बाधित आहेत. तर ३० हजार ७४० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ५,२२८ सक्रीय रुग्ण आहेत. २,७९७ जणांची वैद्यकीय चाचणी प्रतिक्षेत आहे.

नियमांची पायमल्ली

जिल्ह्यात अलीकडे लोकसभा पोटनिवडणूक झाली. त्यापूर्वी लग्न सोहळे आणि यात्रा झाल्या. त्याठिकाणी कोरोना नियमावलीचे पालन केले जावे, असे आवाहन प्रशासनाने केले. पण, प्रत्यक्षात कृतीशिल पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळेच कोरोना संसर्ग वाढत राहिला व आता रुग्ण संख्येत वाढ होऊन भीषणता दिसून येत आहे.

एक नजर

  • गेल्या २४ तासांतील बाधित १,६०४

  • मिडिया बुलेटीनमध्ये बाधित ८४३

  • दिवसभरात कोरोनामुक्त ३६७

  • गेल्या चोवीस तासांत मृत्यू १

  • जिल्ह्यातील सक्रीय रूग्ण ५,२२८

  • चाचणी अहवाल प्रतिक्षेत २,७९७

"बेळगाव, गोकाक व सौदत्ती तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा अधिक आहे. या तालुक्यात शासनाने कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी कडकपणे केली जावी. नियम उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती वा संस्थाविरुध्द गुन्हे दाखल केले जावेत. हलगर्जीपणा खपवूनही घेऊ नका."

- गोविंद कारजोळ, पालकमंत्री बेळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Address: विराट-अनुष्का यांचा लंडनमधील पत्ता सापडला? माजी इंग्लिश खेळाडूने दिली हिंट

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

Latest Maharashtra News Updates : देवदर्शनाच्या रांगेत महिलेचे मंगळसूत्र लंपास

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत आकाशातून कोसळला लोखंडी तुकडा? चौकशीत उलगडा

SCROLL FOR NEXT