Corona Report Negative of Three in Shrigonda 
पश्चिम महाराष्ट्र

श्रीगोंद्यातील तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह पण चौथी संशयित तरूणी सापडली

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : तालुक्यातील कोरोना संशयित असणाऱ्या तिघांचे अहवाल निगेटिव्ह येऊन काही तास उलटले असतानाच श्रीगोंदयात अजून एक कोरोना संशयित आढळला आहे. ही तरुण मुलगी असून तिच्यावर पुण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या संशयित रुग्णाच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविला आहे. तो अहवाल लवकर मिळेल.
या माहितीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, सदर मुलगी ही कुठल्याही कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली नसल्याची माहिती आहे. तिला तर अस्वस्थ वाटू लागल्यावर 29 मार्च रोजी नगरला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. निमोनियाचे लक्षणे वाटली होती. त्यामुळे तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेतला.
पुन्हा तिला दोन दिवसांपूर्वी त्रास झाला. तिला नगरला घेऊन जाण्यासाठी आम्ही तयारी केली. मात्र, त्यांनी पुण्याला उपचार घेण्याची मागणी करीत ते पुण्यात पोहचले. सध्या ती तेथे उपचार घेत आहे. निमोनियाबाबत तिचे लक्षणे असली तरी कोरोना तपासणीसाठी घशातील स्त्राव घेतला आहे. आज किंवा उद्या तो अहवाल मिळेल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT