Corona suspected old woman refused to admit in hospital at civil 
पश्चिम महाराष्ट्र

दुर्दैवी : कोरोना संशयित वृध्देला हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारला, वाचा कुठे घडली घटना

बलराज पवार

सांगली : मिरज सिव्हीलमध्ये दाखल करण्यासाठी आणलेल्या कोरोना संशयित 75 वर्षीय महिलेस रुग्णवाहिकेतच दोन तास उपचाराअभावी ताटकळत पडावे लागले. जिल्हा शल्य चिकित्सकांसह कोणीही तक्रार करूनही लक्ष दिले नाही. उलट खाटा नसल्याचे सांगून त्यांना अन्य दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप नगरसेवक अभिजित भोसले यांनी केला. शासकीय यंत्रणेचा अनागोंदी कारभार सुरू असून याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

ते म्हणाले, हनुमान नगरात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास एक 75 वर्षीय महिला तब्येत बरी नसल्याने रस्त्याकडेला पडली होती. ती कोरोना संशयित असल्याचे दिसू लागल्याने महापालिकेची रुग्णवाहिका बोलावून मी स्वत: व कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून तिच्या नातेवाईकांसमवेत तिला मिरज सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी हलवले.

मात्र दुपारी अडीचपासून साडेचारपर्यंत कोणीही तिला पहायला आले नाही. 
याबाबत संबंधित यंत्रणेला नगरसेवक भोसले यांनी धारेवर धरल्यावर, कर्मचाऱ्यांनी माहिती दिली नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर तिला खाटा शिल्लक नसल्याचे सांगत कोणताही उपचार न करता अन्य दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. 

भोसले म्हणाले, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे याबाबत तक्रारीसाठी वारंवार फोन केले. पण त्यांनी फोन घेतला नाही. अखेर उपायुक्त स्मृती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मिरज रस्त्यावरील हॉस्पिटलमध्ये तिला आयसोलेशन विभागात उपचारासाठी दाखल केले. रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. याप्रकरणी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. 

संपादन - युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Winter Arthritis Pain in Women: महिलांनो सावधान! हिवाळ्यातील सांधेदुखीमागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारण

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिका तारखा जाहीर होताच मनसे आणि ठाकरे गट लागले कामाला

UP Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दाट धुक्यामुळे ५ बस आणि कार एकमेकांना भिडल्या, ४ ठार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

SCROLL FOR NEXT