corona testing of college students and teachers in balgam the proportion is very less in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीत संसर्गाचे प्रमाण कमी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव शहरातील पदवी, अभियांत्रकी व पॉलिटेक्‍निक महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पूर्ण झाली आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून सुमारे २,८०० जणांची कोरोना चाचणी झाली. त्यात केवळ ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सुमारे ६,८०० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आज पूर्ण झाली आहे. प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मिळून केवळ २३ जण बाधित आढळले. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. १७ नोव्हेंबरपासून पदवी महाविद्यालये सुरू करण्यात आली. तेथील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीही त्याच दिवशी सुरू करण्यात आली. चार दिवसांच्या या मोहिमेत आरोग्य विभागाच्या पथकाने महाविद्यालयात जाऊन स्वॅब घेतला. 

पहिल्याच दिवशी सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र त्यानंतरच्या टप्प्यात केवळ दोघांचाच अहवाल पॉझिटिव्ह आला. चार दिवसांनंतर आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांचा स्वॅबही जमा केला. दोन आठवडे चाललेली ही मोहीम शनिवारी पूर्ण झाली. त्यात केवळ १५ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

महाविद्यालये सुरू केल्यानंतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता, पण दिवाळीनंतर बंगळूरसह देशातील अनेक शहरांत बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे शाळा डिसेंबर अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

संसर्गाचे प्रमाण नगण्यच

महाविद्यालयात प्रवेशासाठी कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी बिम्स येथे जाऊन कोरोना चाचणी करून घेतली. चाचणीसाठी तेथे गर्दीही होते. मात्र, एकंदर कोरोना संसर्गाचे प्रमाण खूपच कमी आहे. ‘बिम्स’मध्ये तपासणी करून घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्येही कोरोना संसर्ग कमी असल्याची माहिती मिळाली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नापिकी, भावही नाही अन् कर्जाचं ओझं वाढलं, शेतकरी दाम्पत्यानं घेतला विषाचा घोट; पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज

Jayakwadi Dam: पैठण व माजलगाव तालुके धोक्याच्या छायेत; धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने गोदाकाठची गावं संकटात

Pune Rain News : पुण्यात ११ तासांपासून मुसळधार पाऊस, नागरिकांचे हाल; सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Kalu Waterfall Accident : काळू धबधब्याजवळ दरड कोसळून दुर्घटना, २३ वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू;

मंदिरात लग्न, गर्भपात अन् MBBS विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू; मुलीच्या तोंडातून येत होता फेस, दोन डॉक्टरांची धक्कादायक प्रेमकहाणी

SCROLL FOR NEXT