corona testing report of 15 people who from england in balgam report negative 
पश्चिम महाराष्ट्र

दिलासादायक ; इंग्लंडहून बेळगावला आलेल्या पंधरा जणांचा अहवाल निगेटिव्ह

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : इंग्लंड येथून बेळगाव जिल्ह्यात आलेल्या पंधरा जणांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव शहरातील बी. के. मॉडेल शाळेतील मतमोजणी केंद्राला भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 

इंग्लंड येथून बेळगावात आलेल्या एका महिलेचा अहवाल गेल्या आठवड्यात निगेटीव्ह आला होता. पण त्यानंतर इंग्लंड येथून आणखी 15 जण बेळगाव जिल्ह्यात आले होते. त्यातील दहाजण बेळगाव शहरातील तर उर्वरीत पाच जण जिल्ह्यातील विविध ठिकाणचे आहेत. इंग्लंड येथून आलेल्यांची कोरोना तपासणी करण्याचा व त्यांना काही काळ होम क्वारंटाईन करण्याचा शासनाचा आदेश आहे. त्यानुसार बेळगाव जिल्हा आरोग्य विभागाने त्या पंधरा जणांचा स्वॅब घेतला होता. त्या सर्वांचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

अहवाल निगेटीव्ह आला असला तरी त्या पंधराजणांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. राज्यातील कोरोना नियंत्रणात आला असताना इंग्लंड येथील कोरोनाच्या नव्या विषाणूची धास्ती देशात तसेच कर्नाटक राज्यातही निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या नव्या विषाणूंबाबत राज्यशासनाने नवी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार इंग्लंडहून आलेल्यांची कोरोना तपासणी सक्तीने केली जात आहे. 

इंग्लंडहून आलेल्यांचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर होते. पण त्यांना शोधण्यात प्रशासनाला यश मिळाले व आता त्यांच्या तपासणीचा अहवालही निगेटीव्ह आल्यामुळे अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग खूपच कमी झाला आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे. अशा स्थितीत इंग्लंड येथील नव्या कोरोना विषाणूची धास्ती निर्माण झाली होती. पण इंग्लंड देशाची विमानसेवाच बंद करण्यात आली आहे. त्याआधी जे देशात, राज्यात किंवा जिल्ह्यात आले त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यासाठी ही समाधानाची बाब ठरली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT