cock.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना व्हायरसचा कोंबड्यांशी संबंध नाही 

सकाळवृत्तसेवा

सांगली, ः कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने कोरोना किंवा अन्य रोगाची लागण होत असल्याच्या अफवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पसरल्या जात आहेत. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. मात्र कोरोना व अन्य व्हायरसचा कोंबड्यांशी संबंध नाही.

कोणताच व्हायरस 56 डिग्री तापमानाच्यावर तग धरू शकत नाही. आपल्याकडे कोणतेही मांस शिजवूनच खाल्ले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते यांनी आज केले आहे. 

डॉ. संजय धकाते म्हणाले, सध्या जगात कोरोना व इतर व्हायरसची चर्चा सुरू आहे. व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी आणि कुक्कुटपक्षी पालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर कोंबड्यांचे मांस खाल्ल्यामुळे कोरोना व इतर रोगांचा प्रसार होतो, अशी चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी असा दावा केला आहे की, असा कोणताच प्रकार नसून कोंबडीचे मांस खाण्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत कोरोना व इतर व्हायरसविषयी जिल्ह्यात जनजागृती करण्याच्या सूचना डॉ. संजय धकाते यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT