CORONA SUSPECTED WARDBOY 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना ः हॉस्पीटलमधून पळाला वॉर्ड बॉय, मुंबईतून थेट अकोल्याला पायी

शांताराम काळे

अकोले : कोरोनाच्या भीतीने मुंबईतील केईएम रुग्णालयातील वॉर्ड बॉय कुणालाही काहीही न सांगता घरी निघून आला. तालुक्‍यातील घोटीपर्यंत 150 किलोमीटरची पायपीट करीत घरी पोचला. तपासणीसाठी त्यास नगरला पाठविले असून, उद्या (ता. 14) त्याचा अहवाल येईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे यांनी दिली.

मुंबईच्या केईएम रुग्णालयात काही वर्षांपासून हा वॉर्ड बॉय कार्यरत आहे. केईएम रुग्णालयातील कोरोनाबाधित नर्सच्या सान्निध्यात आल्याने तो घाबरला. कोणालाही न सांगता केईएम रुग्णालयातून त्याने धारावीजवळील घर गाठले.

आवश्‍यक कपडे घेऊन वाहनाने टिटवाळापर्यंत आला. पुढे पोलिसांची नाकाबंदी पाहून 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता निघाला. मालवाहतूक करणाऱ्यांनी त्यास वाहनात घेण्यास नकार दिल्याने, त्याने टिटवाळा येथून शहापूर, चौढे, कुमशेतच्या डोंगराच्या कडेने पायी प्रवास करीत रात्री 11 वाजता घोटीला पोचला.

दुसऱ्या दिवशी जवळच असलेल्या सासरवाडी शेलदला जाऊन आल्याचेही त्याने सांगितले. 
घोटी आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यसेवक भाऊसाहेब डगळे, सुरेखा कोके यांनी ही माहिती आरोग्य यंत्रणेला दिली. त्यानंतर तत्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी गोविंद लोहकरे, डॉ. अर्चना बांबळे, आरोग्य पर्यवेक्षक मोहन पथवे, आरोग्यसेवक संजय नवले आदींनी घोटी येथे जाऊन त्याचे समुपदेशन केले. कोतूळ येथून 108 रुग्णवाहिका बोलावून त्यास नगरला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. घोटी व शेलद येथे फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT