Corona will now be tested on the district level 
पश्चिम महाराष्ट्र

आता तालुकास्तरावरच होणार कोरोनाची चाचणी

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात न्यूमोनिया, सर्दी, खोकला, घशात खवखव, धाप लागणारे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. अशा रुग्णांसाठी तालुकास्तरावर वेळीच निदान व्हावे, यासाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच नागरिकांचे स्वॅब घेतले जातील. त्यानंतर तपासणीसाठी पाठविले जातील. या सर्व घडामोडींवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. 

कोरोना रुग्णांच्या शोधाबरोबरच आता "सारी'च्या रुग्णांचेही तत्काळ निदान व्हावे, यासाठी यंत्रणेने तयारी केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकतीच या संदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आढावा घेतला. 

धाप असो की खोकला; सर्वेक्षण होणार 
केंद्र व राज्य शासनाने, ज्यांना श्वसनविकाराचा तीव्र त्रास होत आहे, अशा नागरिकांचे सर्वेक्षण करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार पाच वर्षांवरील सर्व व्यक्तींना अचानक सुरू झालेला 38 अंश सेल्सिअस ताप असेल, खोकला, घशात खवखव जाणवत असेल, धाप लागणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, अशा आणि रुग्णालयात भरती करण्याची आवश्‍यकता असणाऱ्या व्यक्तींना रुग्ण म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात अशा रुग्णांची नोंद करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेला आदेश दिले होते. त्यानुसार गाव आणि तालुकानिहाय अशा रुग्णांचा शोध घेतला जात आहे.

नागरिकांनीही अशा रुग्णांची माहिती जवळच्या आरोग्य यंत्रणेला द्यावी, जेणे करून संबंधित रुग्णांवर वेळेत उपचार करणे शक्‍य होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Changes: गणेशोत्सवात पुण्यात मोठा वाहतूक बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाला मुहूर्त, सात खासगी मिळकतींचा प्रश्न मार्गी; १० वर्षांचा तिढा सुटला

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

Marathi News Live Updates :गौतमी पाटलांविरोधात भाजप नेत्या आक्रमक, अश्लील हावभाव केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT