Corona to a young woman from Russia who came to Islampur 
पश्चिम महाराष्ट्र

रशियातून इस्लामपूर शहरात आलेल्या युवतीला कोरोना 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) : शहरातील महादेवनगर परिसरातील 20 वर्षे वयाची एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ती 26 जून रोजी किर्गिस्थान रशियाहुन ती आधी नागपुरात तर 27 जून रोजी इस्लामपुरात आली होती.

ती ज्या विमानाने आली त्यातील सहप्रवासी असलेल्या अमरावती येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वाळवा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने महादेवनगर-इस्लामपूरमधील या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. तो तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तिच्या संपर्कात असलेल्या घरातील दोघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासह घरातील दोघांनाही येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. शहरातील महादेवनगर हा भाग अत्यंत गर्दीचा असल्याने नागरिकांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नगरपालिका आणि तालुका आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

NDA Success Story: जिद्द, चिकाटी अन् कठोर प्रशिक्षणाचा विजय; पदकविजेत्या छात्रांनी उलगडला तीन वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT