ऑक्सिजन sakal
पश्चिम महाराष्ट्र

‘ऑक्सिजन’विरला हवेत?

कोरोनाकाळातील वापराचा हिशेब मिळेना

अजित झळके

सांगली: जिल्ह्यात कोरोना संकटाच्या दीड वर्षात रुग्णांना नेमका किती ऑक्सिजन वापरला गेला, याचा कोणताही एकत्रित हिशेब जिल्हा प्रशासन, औषध प्रशासन आणि शासकीय वैद्यकीय विभागाकडे उपलब्ध नाही. त्या काळात नियमित अहवाल पाठवले गेले होते, मात्र ऑक्सिजन वापराची एकूण स्थिती काय राहिली? खासगी रुग्णालयांनी दाखवलेला वापर आणि प्रत्यक्ष उपलब्ध झालेला ऑक्सिजन याचा ताळमेळ लागतो आहे का, याचे कोणत्याही स्वरूपाचे ऑडिट झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. आतापर्यंत सुमारे दोन लाखांहून अधिक रुग्णांवर कोरोनाचे उपचार करण्यात आले. जिल्ह्यात एकवेळ ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता आणि त्यातून रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. त्यातील किती रुग्णांना ऑक्सिजनचा वापर केला गेला? किती रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवले गेले? जिल्ह्यात ऑक्सिजन किती आले? सर्व रुग्णालयांनी दाखवलेला ऑक्सिजनचा वापर आणि प्रत्यक्षात उपलब्ध ऑक्सिजन याचा ताळमेळ लागतो आहे का, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आतापर्यंत तरी प्रशासनाने शोधलेली नाहीत. हा संवेदनशील विषय असूनही जिल्हा प्रशासनाकडून त्याचा सखोल अहवाल का बनवला गेला नाही, हे अनुत्तरीत आहे.

‘सकाळ’ने गेल्या दोन महिन्यांपासून औषध प्रशासनाकडे याबाबतची आकडेवारी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा केला. ऑक्सिजनच्या वापराचे आणि व्यवहाराचे ऑडिट झाले असेल; तर त्याबाबतचे अहवाल मागितले. या विषयाला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. असा कोणताही अहवाल अद्याप तयार करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. कोरोना काळात रोजची आवक आणि वापर याची माहिती राज्य शासनाकडे पाठवली जात होती, मात्र त्याचे एकत्रीकरण केले नाही, असे औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले. मिरजेत ॲपेक्स रुग्णालयाने घातलेला घोळ सर्वांनी पाहिला आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ केला गेला. कुपवाड परिसरातील आणखी एका रुग्णालयावर संशय व्यक्त केला गेला होता. इतके सारे घडलेले असताना ऑक्सिजनच्या वापराच्या नियंत्रणाबाबत आणि त्याच्या एकूण ऑडिटबाबत गांभीर्य का नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

कोरोनाकाळातील वापराचा हिशेब मिळेनाऑडिटबद्दलही शंकाच सकाळ’च्या पाठपुराव्यालाहीप्रतिसाद नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT