corona 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत "वॉर रुम'मध्येच कोरोनाचा हल्ला 

अजित झळके

सांगली ः जिल्हा परिषदेची यंत्रणा हादरवून टाकणारी बातमी आज सकाळी हाती आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात साथ रोग नियंत्रण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीलाच कोरोनाने गाठले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा हादरून गेली आहे. हे अधिकारी सध्या कोरोना वॉर रुममध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या पत्नी आणि मुलालाही कोरोना झाला असून त्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


संपूर्ण जिल्ह्याचे कोरोना नियंत्रण जिल्हा परिषदेतील वॉर रुममधून केले जाते. तेथे काही अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या, त्यांच्या संपर्कात आलेले लोक, नाक्‍यावर अडवून तपासणी केलेल्याची माहिती यांचे संकलन करतात. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची स्थिती, नवे रुग्ण, बरे झालेले रुग्ण, क्वारंटाईन लोक यांचा डाटा तेथे एकत्र केला जातो. या कक्षात संबंधित अधिकारी जबाबदारीचे काम करत होते. आता त्यांनी या यंत्रणेतूनच कोरोनाची लागण झाली की त्यांचा संपर्क अन्यत्र कुठे आला होता, याबद्दल माहिती घेण्याचे काम सुरु आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात या अधिकाऱ्याची बैठकीला हजेरी होती. त्यामुळे त्यांचे कक्ष आता सॅनिटराझ करण्यात येत आहेत. संपूर्ण जिल्हा परिषद मुख्यालयात खबरदारीची उपाय योजना केली जात आहे. गेल्या आठवडाभरात जिल्हा परिषदेत अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. त्यात बदली प्रक्रियेच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले होते. त्या आंदोलनात संबंधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेले काही लोक हजर होते, असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT