Corona's effect : deduction in salaries of employees in Sangali 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाच्या झळा : इथल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात केली कपात

सकाळवृत्तसेवा

सांगली ः सांगली, मिरज आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचे गत मार्च महिन्याचे पूर्ण पगार झाले नाहीत. कोरोना आपत्तीच्या झळा तीव्र होत आहेत. वित्तीय अडचणींमुळे बंद काळातील पगार थकले आहेत. उत्पादन व पुरवठा साखळीच थबकल्याने उद्योजकांसमोर आव्हानांचा डोंगर उभा राहिला असून कष्टकरी कामगारांपुढेही मोठे संकट असेल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद काळातील पगार देण्याचे आवाहन केले होते. तीनही औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक त्यासाठी राजीही आहेत. जवळपास 21 मार्चपासून उत्पादन बंद झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कर्जाच्या हप्त्यांना तीन महिने मुदतवाढ दिली जाईल असे जाहीर केले असले तरी सहकारी आणि खासगी बॅंकांकडून या आदेशाचे पालन झाले नसल्याची तक्रार उद्योजकांची आहे. लघुउद्योजकांची कर्जे याच बॅंकांची असून त्यांच्याकडून हप्ते तसेच व्याज वसुली झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

परिणामी अनेक उद्योजकांना मार्चचा पुर्ण पगार करता आलेला नाही. 
दरम्यान उत्पादन बंद, कच्चा मालाची उधारी देण्याची मुदत संपली आणि उत्पादन विक्रीची बिले अडकली अशा कोंडीत उद्योजक सापडले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी उद्योजकांची धडपड सुरू आहे. येत्या 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठेल आणि गाडा रुळावर येण्यास सुरवात होईल अशी उद्योजकांची आशा आहे. त्यानंतरच बंद काळातील पगाराच्या रकमा दिल्या जातील असे सांगण्यात आले. उद्योजक प्रतिनिधींनी मात्र येत्या चार-पाच दिवसांत बहुतांशी पगार होतील असा दावा केला. 

आठवडाभरात उर्वरित पगारही होतील
उत्पादन आणि पुरवठा अशी साखळीच गेल्या वीस मार्चपासून खंडित झाली आहे. त्याचे दुष्परिणाम उद्योगांवर झाले आहेत. मिरज औद्योगिक वसाहतीमधील सुमारे 40 टक्के उद्योजकांनी पार्ट पेमेंट केले आहे. पुढच्या आठवडाभरात उर्वरित पगारही होतील. येणारा कालखंड उद्योग क्षेत्रासाठी बिकट आहे. यातूनही आम्ही तगून जावू.'
- संजय आराणके, अध्यक्ष, मिरज औद्योगिक वसाहत 

बंदकाळातील पगारही देणे कर्तव्याचा भाग

कुपवाड वसाहतीत सुमारे सहाशे उद्योजक आहेत. त्यापैकी ऐंशी टक्के उद्योजकांनी 21 मार्चपर्यंतचे पगार केले आहेत. बंदकाळातील पगारही देणे कर्तव्याचा भाग आहे. तो येणाऱ्या काळात नक्की होईल.'' 
- सतीश मालू, अध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर 

शासन निर्णयाप्रमाणे पूर्ण पगार

आमच्या वसाहतीत सुमारे 185 युनिट आहेत. बहुतेक उद्योजकांनी पगार केले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून ते सुरू आहेत. सर्वच युनिट शासन निर्णयाप्रमाणे पूर्ण पगार देतील.
- सचिन पाटील, अध्यक्ष, वसंतदादा औद्योगिक वसाहत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT