Corona's scare: Summer in full swing, but soft drink vendors in loss 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाची धास्ती : उन्हाळा जोमात, पण शीतपेय विक्रेते कोमात

सकाळवृत्तसेवा

झरे (जि . सांगली) : लॉकडाऊन व कोरोनाच्या महामारीमध्ये शीतपेयाचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. उन्हाळ्यामध्ये थंड पाणी राहण्यासाठी ग्रामीण भागामध्ये मडक्‍याचा वापर केला जातो. परंतु या चार महिन्यांमध्ये ग्रामीण भागांमध्ये एक ही मडके खपले नाही. त्यामुळे कुंभार दादांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये अनेक तरुण कुल्फी, आईस्क्रीम विकण्यासाठी सायकलवर किंवा मोटार सायकल वरती घरोघरी जाऊन विकत असतात. तर अनेक दुकानात थंडपेय मिळतात. हॉटेल, किराणामाल, स्टेशनरी, कोल्ड्रिंग सेंटर यामध्ये थंड पेयाची विक्री केली जाते. 

परंतु या तीन महिन्यांमध्ये लॉकडाऊन व कोरोनाचा प्रादुर्भावामुळे दुकाने उघडलीच नाहीत. तर ग्रामीण भागामध्ये कुंभार दादांनी मडकी बनवली नाहीत. त्यामुळे शीतपेय विक्रेते व कुंभार यांचा व्यवसाय थंडावला आहे. 
यावर्षी अनेक नागरिकांनी फ्रीज, एसी, कूलर बंदच ठेवले होते व थंड पिण्यास टाळले होते. कारण वारंवार माहिती मिळत होती की कोरोनाचे विषाणू थंड ठिकाणी जास्त काळ जिवंत राहू शकतो. यामुळे सर्व नागरिकांनी अख्खा उन्हाळा उखाड्यांमध्ये काढला. परंतु थंडपेय घेण्याचे टाळले तर घरांमध्ये एशी, फ्रीज, कूलर बंद ठेवले होते. 

त्यामुळे यावर्षी शीतपेयाचा धंदा पूर्ण थंडावला होता. तर घरगुती फ्रीज म्हणजे माती पासून बनवलेले मडके याची सुद्धा विक्री झाली नाही. किंवा कोणी मागणी सुद्धा केली नाही. त्यामुळे हे व्यवसाय करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी शासनाकडून काहीतरी मदत मिळावी, अशी मागणी शीतपेये विक्रेते व मडके बनवणारे कुंभार समाज यांच्यातून होत आहे. 

उन्हाळा उखाड्यात 
थंड ठिकाणी कोरोना विषाणू थांबतात म्हणून नागरिकांनी अख्खा उन्हाळा उखाड्यात काढला. लाईट असून सुद्धा फ्रीज, कूलर, एसी बंद ठेवली व कोणतेही थंड घेतले नाही. त्यामुळे शीतपेये व मडक्‍याचा व्यावसायिक करणारे अडचणीत आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT