CORONA PATIEN DETH 
पश्चिम महाराष्ट्र

नगरमध्ये कोरोनाचा दुसरा बळी, कोपरगावच्या महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव- शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणारी महिला कोरोनाशी झुंज देत असताना अखेर आज पहाटे तिची प्राणज्योत मालवली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी  या घटनेस दुजोरा दिला आहे . यानिमित्ताने तालुक्यात कोणाचा पहिला बळी गेला असल्याचे समोर येत आहे.

यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. तो गतिमंद असल्याचे सांगितले जाते. मात्र, आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील लोकांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २८जणांना लागण झाली आहे. त्यातील तिघे बरे होऊन घरी गेले आहेत.तर दोन जणांना मृत्यूने गाठले.

गेल्या शुक्रवारी लक्ष्मीनगर भागातील या 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले होते. त्या आधीच तिला ग्रामीण रुग्णालयात न्यूमोनियाची उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर सदर महिलेस सुरुवातीस नगर येथील बूथ हॉस्पिटल व त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती.

सदर महिलेच्या संपर्कात असलेले 13 जणांचे अहवालही निगेटिव्ह आले होते. मात्र, सदर महिलेची आज सकाळी प्राणज्योत मालवली. त्या महिलेची झुंज थांबल्याने कोपरगावकरांची चिंता मात्र वाढली. शासकीय स्तरावर सर्व अधिकारी कर्मचारी शहर व तालुक्याची काळजी घेत असताना नागरिक मात्र अजूनही गाफील असल्याचे दिसून येत आहे. मात्र कोपरगावकरांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT