coronaviras misunderstanding blow in rural areas in kolhapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

Video : गैरसमजूतीचा फटका ; वाट अडवली तरी बाळंतीनीचा प्रवास सुखरूप....

शिवाजी यादव

कोल्हापूर  : रूग्ण किंवा जखमीला तातडीने दवाखान्यात दाखल केल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत गावोगावी 108 रूग्णवाहिकांची सेवा वरदान ठरली आहे. मात्र लॉकडाऊन व कोरोना विषयक गैरसमजातून गावच्या वाटा अडवल्या आहेत. त्याचा फटका 108 रूग्णवाहिके बरोबर रूग्णांनाही बसतो आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बेडीव व धामणे (ता. भूदरगड) या गावात अशा अडथळ्यावर मात करीत 108 रूग्णवाहिकेचे डॉ. सचिन सुतार व पायलट दिपक परीट यांनी आपली सेवा देत एका बाळंतीन मातेला वेळीच उपचारापर्यंत सुखरूप पोहचवले आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. गावागावात कोरोना विषयी भिती बरोबर गैरसमजही आहेत. त्यातून काही गावकऱ्यांनी लाकडी ओंडके टाकून गावात प्रवेश बंदी केली आहे. 

108 रूग्णवाहिकेची मदत 
भुदरगड तालुक्‍यात बेडीव नावाचा धनगरवाड्यावर एका बाळंतीनीची प्रकृती बिघडली रात्र कशी बशी घरात काढली. सकाळी थोडेबरे वाटले पण पून्हा वाढत्या उन्हाबरोबर त्रास सुरू झाला. अखेर कोणीतरी 108 रूग्णवाहिका बोलवली. भरधाव वेगाणे रूग्णवाहिका धनगरवाड्याच्या दिशेने आली. खरी पण गावातील लोकांनी झाडांच्या फांद्या टाकून रस्ता अडवलेला संबधीत महिलेला वेळेत दवाखान्यात पोहचवावे कसे याची चिंता डॉक्‍टर व चालकाला पडली त्यांनी रूग्णवाहिका धनगरवाड्यापर्यंतच्या रस्त्या पर्यंत कशीबशी पोहचवली. 

अखेर मार्ग काढलाच
पुढे काही अंतर डॉ. सचिन व पायलट दिपक चालत जात महिलेचे घर गाठले. त्या आजारी महिले सोबत दोन नातेवाईक महिलांना घेऊन काही अंतर जंगली वाटेतून चालत रूग्णवाहिकेत आणून बसवले. रूग्णवाहिका सुरू झाली. पुढे आल्यावर रस्त्यातील ओंडके असल्याने रूग्णवाहिका पुढे जाणे मुश्‍कील झाले. डॉ. सचिन व दिपक गाडीतून उतरले त्यांनी शेजारच्या घरातील पहार मागून घेत भर उन्हात स्वतः ओंडके बाजूला केले. रस्ता खुला केला आणि रूग्णवाहिकेचा प्रवास पुढे गडहिंग्लज दवाखान्यात पर्यंत सुखरूप झाला.

 थोडी अशी खंतही

संबधीत महिलेला ऍडमीटकरून रूग्णवाहिका गारगोटी गावी जात होती. पून्हा धामणे गावा जवळ रस्ता अडवला होता तोही डॉक्‍टर व पायलटने मोकळा करीत रूग्ण वाहिका पुढे नेली. अडचणीवर मात करीत बाळंतीनीस वेळीच उपचारासाठी पाठवले याचा आनंद डॉक्‍टरांना झाला पण गावकऱ्यांनी सगळ्याच वाटा बंद करून आपल्या गावात अडचणीच्या वेळी मदतीला येणाऱ्या रूग्णवाहिकेची वाट अडवल्या बद्दल खंत वाटली पण ते काही करू शकले नाहीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT