coronavirus impact ganesh festival sangli city 
पश्चिम महाराष्ट्र

ना मिरवणूक...ना मंडप, कोरोनाच्या नियमांचे सर्वतोपरी पालन

शैलेश पेटकर

सांगली -  शहर आणि परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा आज विराजमान झाले. यंदाच्या उत्सवात कोणताही डामडौल, मंडप, वाजंत्री, मिरवणूक दिसून आलेली नाही. मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या घरीच मूर्ती प्रतिष्ठापना करून कोरोना नियमांचे सारे पालन करण्यात आल्याचे दिसून आले. 

कोरोना संकट काळात यंदाचे सर्वच उत्सव एक तर रद्द झालेत किंवा साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. गणेशोत्सव घरातच करण्याच्या पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व मंडळानी होकार दिला. त्यानुसार आज अपवाद वगळता रस्त्यावर कोठेही मंडप घालण्यात आलेला नाही. मंडळांनी अध्यक्ष किंवा सदस्याचा घरी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे दिसून आले. आज सकाळपासून मंडळांच्या गणेश मूर्ती नेण्यासाठी लगबग दिसून आली. अगदी मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा बाप्पांचे स्वागत करण्यात आले. 

ज्याठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याठिकाणी आरास, सजावट करण्यात आली होती. शहरातील मोठ्या मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठाना केली असून कोणताही मिरवणूक काढण्यात आलेली नाही. काही मंडळांनी शाडूची मूर्ती प्रतिष्ठापना करून सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. काही मंडळांनी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Konde: ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना पुण्यात मारहाण; आरती मारणे-पवार यांची बदनामी केल्याचा आरोप

Manchar News : मंचर विकास आराखड्यात दुरुस्ती करण्याचे मुख्याधिकारी किरण मार्कंड यांचे लेखी आश्वासन; ग्रामस्थांनी उपोषण घेतले मागे

India A Beat Nepal: आधी तिलक कुशाग्राची शतकांची आतषबाजी, मग प्रिन्स यादव हर्षित राणाचा कहर; भारत 'अ' संघाचा नेपाळवर ३०६ धावांनी दणदणीत विजय

Exclusive : लोकलमधील चाकूहल्ले रोखण्यासाठी २,५०० कोटींची योजना; रेल्वे बोर्डाचा हिरवा कंदील कधी? १५० स्थानकांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण; ३८ संवेदनशील ठिकाणे निश्चित

डिसेंबर महिना ठरणार लकी! ६ राशींचे अच्छे दिन; नोकरीच्या नव्या संधींसह, रखडलेली कामंही होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT