DENGU.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

महापालिकेने कोरोनाला रोखले...आता मात्र याचा धोका

सकाळवृत्तसेवा

सांगली- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने गेले दोन महिने कसून प्रयत्न केले. आता पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यूचाही धोका आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे 27 ते 29 मे अखेर घर घर सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये डास उत्पत्ती स्थानाची पाहणी केली जाणार आहे. 


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने मार्चपासून संचारबंदी, लॉकडाऊनच्या काळात नियोजनबध्द काम केले. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने कोरोनाला रोखण्यात यश मिळवले आहे. आता डेंग्यूचा धोका निर्माण होऊ पहात आहे. शहरात काही भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचे पावसाळ्यात गंभीर साथीत रुपांतर होण्यापुर्वी आता महापालिकेने घर घर सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. 
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, महापालिका क्षेत्रात कोरोनाबरोबर डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 27, 28 आणि 29 मे असे तीन दिवस घरनिहाय डास उत्पत्ती स्थानांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या अंतर्गत घर, घरांचा परिसर स्वच्छ आहे का, घरांच्या छतावर स्वच्छता आहे का, घराच्या परिसरात भंगार, निरुपयोगी वस्तू साठवून ठेवण्यात आल्या आहेत का याची पाहणी करण्यात येणार आहे. या बरोबरच प्रत्येक घरातील पाणी साठवण्याचे भांडे, जागा एक दिवस कोरडी, स्वच्छ ठेवली जाते का? नसल्यास तेथे डासांची उत्पत्ती झाली आहे का याचीही पाहणी करुन आवश्‍यक उपाययोजना करण्यात येणार आहे. 
नागरिकांनी आपल्या घराचे छत, घराचा परिसर, पाणी साठवण्याची ठिकाणे स्वच्छ करुन घ्यावीत. महापालिका कर्मचाऱ्यांना सर्व्हेक्षणात वरील बाबतीत निष्काळजीपणा करुन डासांची उत्पत्ती स्थाने तयार झाल्याचे आढळल्यास अशा कुटुंबांना पाचशे रुपये दंड करण्यात येणार असल्याचे आयुक्त कापडणीस म्हणाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

SCROLL FOR NEXT