TEACHER 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली शिक्षक बॅंकेत भ्रष्टाचाराचा कळस : विनायकराव शिंदे, समविचारींची युती करणार 

अजित झळके

सांगली ः शिक्षक बॅंकेत भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. सभासदांच्या हितासाठी काहीही केले जात नाही. त्यामुळे यावेळी शिक्षक बॅंकेत शिक्षक संघाची ताकद दिसेल, असा विश्‍वास संघाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे यांनी व्यक्त केला. 


खानापूर येथे श्रीक्षेत्र शुक्राचार्य येथे आयोजित जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, सरचिटणीस अविनाश गुरव प्रमुख उपस्थित होते. 
विनायक शिंदे म्हणाले, ""शिक्षक बॅंकेत व्याजदर कमी करणे, लाभांश वाटप याबाबत सत्ताधारी गंभीर नाहीत. निवडणुकीत त्यांचा पर्दाफाश करू. खोटे बोलायचे दिवस संपले. आम्ही समविचारी संघटनांशी युती करू. सभासद हितासाठी बॅंक वाचली पाहिजे. या मुद्द्यावर विरोधक एकत्र येऊ. येतील त्यांच्यासह आणि राहतील त्यांच्या शिवाय शिक्षक बॅंकेत संघाची सत्ता आणू.'' 


सरचिटणीस अविनाश गुरव म्हणाले, ""शिक्षकांची कामे करण्यात शिक्षक संघ आघाडीवर आहे. केंद्रप्रमुख पदोन्नती, विषय शिक्षक वेतनश्रेणी यावर आक्रमकपणे आवाज उठवला आहे.'' 
पोपटराव सूर्यवंशी म्हणाले, ""भूतकाळात झालेल्या चूकांपासून बोध घेत यावेळी शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीचे मैदान नक्कीच मारेल. सत्ताधाऱ्यांना सभासदांपुढे जायला तोंड नाही.'' 


संतोष जगताप यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्षांनी आढावा घेतला. युतीबाबतचे सर्वाधिकार जिल्हा शिक्षक संघ व पार्लमेंटरी बोर्डाला दिले. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर "कोविड कर्तव्य निधी' संकलन केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव झाला. 


ख्वाजासो शेख, धनंजय नरुले, श्रीकांत पवार, फत्तेसिंग पाटील, अशोक पाटील, सुधाकर पाटील, महादेव हेगडे, शामगोंडा पाटील, मुरलीधर दोडके, सलीम मुल्ला, टी. के. जावीर आदी उपस्थित होते. संजय पाटील यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT