Krishna River Sakal
पश्चिम महाराष्ट्र

महापुरात पडझड झालेल्या घरांच्या सर्व्हेत भ्रष्टाचार

यंदा कृष्णा नदीला आलेल्या महापुरातील पूरग्रस्ताऐवजी कुडची येथील इतर नागरिकांनी नुकसान भरपाई घेतल्याचा आरोप पूरग्रस्तांतून होत आहे.

एम. ए. रोहिले

रायबाग - यंदा कृष्णा नदीला आलेल्या महापुरातील पूरग्रस्ताऐवजी कुडची येथील इतर नागरिकांनी नुकसान भरपाई घेतल्याचा आरोप पूरग्रस्तांतून होत आहे. यंदा कृष्णा नदीला आलेल्या महापुरात कुडची नगरपरिषद व ग्राम पंचायतीच्या काही प्रभागात पुराचे पाणी घुसल्याने घरांचे नुकसान झाले होते. पूर ओसरल्यानंतर शासनाने पूरग्रस्तांना तात्कालीक मदत म्हणून 10 हजाराची मदत दिली. स्थानिक अधिकारयातर्फे सदस्यांना घेऊन नुकसानीचा सर्व्हे केला. मात्र पूरग्रस्ताऐवजी इतर नागरिकांनाच खात्यावर नुकसानीची जास्त रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांतून नाराजीचा सूर उमटला आहे. ज्यांच्या नावे रक्कम जमा झाली आहे, त्या नागरिकाला 2 हजार रुपये व उर्वरित 8 हजार संबंधित सदस्यांना अशी टक्केवारीही वापरल्याचा आरोप केला जात आहे.

अधिकारयांनी कार्यालयात बसून बनावट कागदपत्रे तयार केल्याचाही आरोप पूरग्रस्तांनी केला आहे. कुडची येथील नगरपरिषद व ग्रामपंचायतीत 10 हजाराच्या मदतीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. दोन्हीकडे न पडलेली घरे पावसाने पडल्याचे दाखविले आहे. तर भरपाईसाठी काहींनी घराच्या भिंती पाडल्या आहेत. ग्रामीण व नगरपरिषदेच्या प्रभागातील सदस्यांनी 5 लाख मंजूर केल्यास त्यातील 50 हजार ते एक लाखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. 2019 साली ज्यांची घरे पडली आहेत. त्यांचीच घरे पडल्याचा प्रस्ताव पुन्हा दिला आहे. प्रशासनाने संबंधित अधिकारी, अभियंत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच बोगस रक्कम घेणारयावरही कारवाईची गरज आहे.

नगरपरिषदेत राहणारयांनी ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत नावे घालून रक्कम हडप केली आहे. एका घरात 4 ते 5 जणांच्या नावे रक्कम घेणारयावर प्रशासनाने कारवाई करावी. भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आमदार पी. राजीव यांनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

यंदा आलेल्या महापुरात सरकारतर्फे दिलेली तत्कालीक 10 हजाराच्या यादीत कुडची नगरपरिषद, ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाला आहे. पुराचे पाणी न आलेल्या प्रभागातील नागरिकांनी रक्कम लाटली आहे. त्यामुळे शासनाने महापुरात पडझड झालेल्या घरांचा नव्याने सर्व्हे करावा. भ्रष्टाचार केलेल्या अधिकारयावर कारवाई करावी. बोगस लाभार्थीकडून रक्कम वसूल करावी. आपण कारवाईची मागणी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, आमदार पी. राजीव, महसूल विभागाकडे केली आहे.

- ईसाक पिरजादे, कु़डची

कुडची येथे घरांच्या पडझ़डीनंतर सर्व्हेमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत चौकशी करण्यात येईल.

- रियाज बागवान, तहसीलदार, रायबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT