cotton crop farmers cultivation ignore this crop in zare sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : शेतकऱ्यांची कापूस लागवडीकडे पाठ; झरे परिसरातून 'पांढरं सोनं' हद्दपार

सदाशिव पुकळे

झरे (सांगली) : झरे (ता. आटपाडी) परिसरातून पांढरे सोने म्हणजे कापूस हद्दपार झाला आहे. कापसाचे एखादे बोंडसुद्धा बघायला परिसरांमध्ये मिळत नाही. हमखास पैसे देणारे पीक होते, परंतु बोगस बियाणांमुळे परिसरातून पांढरे सोने हद्दपार झाले आहे. सर्वसाधारण एप्रिलमध्ये कापसाची लागवड शेतकरी करीत होते. तर सप्टेंबर नंतर कापूस वेचणी सुरू होत असे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत कापसाची वेचणी शेतकरी करीत असे त्यानंतर कापूस काढून गहू किंवा ज्वारी. हरभरा अशी पिके घेत असत. परंतु कापसाचे जसे बोगस बियाणे येऊ लागले. येथील तापमानात उगवन शक्ती कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे त्यामध्ये नुकसान झाले.

कापूस लावल्यानंतर त्याला बोंडे येत असत, परंतु कापूस येत नसत, किडकी बोंडे येत होती. तर काही झाडांना बोंडे सुद्धा लागत नव्हती. त्यामुळे घातलेला खर्चसुद्धा निघेना म्हणून शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ फिरवली व मका पिकाला प्राधान्य दिले. आणि त्यावेळेपासूनच हमखास पैसे मिळण्याचे पीक म्हणून मका पीक शेतकरी घेऊ लागला. दिवस-रात्र कापसाचे व्यापारी गावोगावी घरोघरी जाऊन कापूस खरेदी करत असे.

काही गावांमध्ये आठवड्यातून दोन वेळा कापूस खरेदीसाठी काटे लागत असे त्यामुळे गावा-गावात बाजाराचे स्वरूप येत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये कापूस किंवा कापसाचे बियाणे बघायला सुद्धा मिळत नाही. हमखास पैसे देणारे पीक म्हणजे कापूस बोगस बियाणामुळे कापूस परिसरातून नामशेष झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी मका पिकाकडे कल वळवला परंतु मका पिकाला सुद्धा लष्कर आळीची दृष्ट लागली. त्यामुळे मका लागवडीपासून ते मका निघेपर्यंत तीन ते चार फवारणी कराव्या लागतात. त्यामुळे भविष्यात कापसाप्रमाणे मकासुद्धा हद्दपार होते की काय असे भासू लागले आहे. 

"कापूस बियाणाच्या काही कंपन्या बंद झाल्याने, दुसऱ्या कंपनीचे बियाणे लावल्यानंतर इथल्या तापमानामध्ये बियाणे उगवत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे कापूस लागवडीचा शेतकऱ्यांनी नादच सोडला."

- दिलीप खलारी, उपसभापती मार्केट समिती 

"सहा-सात वर्षांपासून कापूस लागवड बंद झाल्याने शेतकरी मका लागवडीकडे वळला आहे. परंतु मक्‍याला लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्याने. भविष्यात हमखास पैसे देणारे पीक कोणते निवडायचे हा गंभीर प्रश्न आहे."

- विकास पाटील शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सगळे गाढ झोपेत असताना भारताने रचला अंतराळात इतिहास! रात्री ११:५१ वाजता नेमकं काय घडलं? ISRO ची मोठी कामगिरी!

आजचे राशिभविष्य - 31 ऑक्टोबर 2026

Corn Rava Dhokla: नाश्त्यासाठी बनवा मऊसूत कॉर्न रवा ढोकळा; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल!

MPSC Student : विद्यार्थी गावाकडे; स्पर्धा परीक्षांच्या अर्थचक्राला फटका; क्लास, अभ्यासिका, मेस आणि वसतिगृहांमधील विद्यार्थीसंख्या घटली

Pune News : नेहरू स्टेडियमबाहेर मोटारीत आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह

SCROLL FOR NEXT