Councilors against officers and officers in Shevgaon Council 
पश्चिम महाराष्ट्र

अधिकारी-पदाधिकाऱ्यांविरुद्ध नगरसेवक

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव (नगर): शेवगाव नगरपालिकेत अधिकारी- पदाधिकारी विरुद्ध नगरसेवक, असा वाद रंगला आहे. स्वच्छता विभागांतर्गत शहरस्वच्छतेसाठी नेमलेला ठेकेदार नियमाप्रमाणे काम करीत नसल्याने त्यास बिल अदा करू नये. तसेच, पालिकेच्या बायोमायनिंग मशिन खरेदीत गैरव्यवहार झाला. त्याच्या चौकशीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व अपक्ष 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यामुळे हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कचऱ्याच्या ठेकेदार एजन्सीने शहरस्वच्छतेसह औषधफवारणी, सार्वजनिक शौचालये, नाली-गटारे स्वच्छ करणे, कचरा उचलून त्याची वर्गवारी करणे, त्यापासून खत तयार करणे, आदी कामे करणे बंधनकारक होते. तसेच, ठेकेदाराने अवघ्या दोन ते अडीच चौरस मीटर कचऱ्यावर प्रक्रिया केल्याचे आढळून आले. ठेकेदार व अधिकारी संगनमताने संपूर्ण बिल अदा करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यापुढे कोणतेही बिल सर्वसाधारण सभेतील चर्चेशिवाय अदा करू नये, तसेच डंपिंग ग्राउंड, घनकचरा प्रोसेसिंग, नवीन मशिन खरेदी, जमीनखरेदी यांसारख्या विषयावरही सर्वसाधारण सभेत चर्चा व्हावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

कचऱ्याच्या बायोमायनिंग मशिन खरेदीत गैरव्यवहार झाला असून, हे मशिन निकृष्ट आहे. त्याचे स्पेअर पार्ट गंजले आहेत. मशिन खरेदीसाठी 38 लाखांपर्यंत खर्च करता येतो, अशी अट आहे. त्याचा फायदा घेत, प्रत्यक्षात तीन ते चार लाखांच्या मशिनवर 32 लाख रुपये खर्च केले आहेत. या सर्व व्यवहाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी. मशिनची मूळ किंमत तपासण्यासाठी तांत्रिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी. दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.

निवेदनावर नगरसेवक अरुण मुंढे, विद्या लांडे, कमलेश गांधी, रेखा कुसळकर, नंदा कोरडे, यमुनाबाई ढोरकुले, भाऊसाहेब कोल्हे, विकास फलके, अजय भारस्कर, शब्बीर शेख, रत्नमाला तिजोरे, शारदा काथवटे, पद्मा आधाट, वर्षा लिंगे आदींच्या सह्या आहेत.

राज्य सरकारच्या जी. एम. पोर्टलवरील किमतीनुसार पालिकेने मशिन खरेदी केले. पालिकेला त्यासाठी पोर्टलवर अधिकृत मागणी नोंदवावी लागली. खुल्या बाजारातून मशिन खरेदीचा अधिकार पालिकेला नाही. स्वच्छतेसाठी नेमलेल्या एजन्सीला निविदेप्रमाणे केलेल्या कामाचे मूल्यमापन करून मार्चपासून जुलैपर्यंतचे बिल अदा केले आहे. ऑगस्टपासून आजपर्यंतचे बिल दिलेले नाही.
- अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी, शेवगाव पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT