TAG20A00661.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

अपंग दांपत्यांना मिळाले 5 मिनिटात शिधापत्रिका 

सकाळवृत्तसेवा


तासगाव  : शिधापत्रिका मिळण्यासाठी अनेक वर्षे धडपडनाऱ्या अपंग पती पत्नीना अवघ्या काही मिनिटात तासगावच्या तहसीलदारानी शिधापत्रिका देऊन आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला. अपंगतवाचा दाखला मिळण्यासाठी शिधापत्रिका आवश्‍यक होती आणि तीच मिळत नव्हती. 


सरकारी दिरंगाई आणि दुर्लक्षाचे अनेक किस्से आपण नेहमीच ऐकतो मात्र आज तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी प्रशासकीय समजुतीला धक्का देत माणुसकीचा प्रत्यय आणून दिला. तासगाव येथील बाळासाहेब महादेव बाटे वय 56 पूर्णपणे मुके आहेत. त्यांच्या पत्नी शालन या पण अपंग आहेत. यांना तिन्ही मुलीच आहेत. त्यांना अपंगत्वाचा दाखला, अपंग पेन्शन, व बस मोफत पास या शासकीय सवलती मिळण्यासाठी रेशनिंग कार्डाची आवश्‍यकता होती. त्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू होता.

रुग्णसेवक कार्यकर्ते निसार मुल्ला यांना हा प्रकार पालिका कर्मचारी महादेव लुगडे आणि आयुब मनेर यांच्याकडून समजताच त्यांनी बाटे कुटुंबियांची पूर्ण माहिती घेऊन बाटे पती पत्नी यांना तहसीलदार ढवळे यांना भेटवून परिस्थिती विशद केली. तहसीलदार ढवळे यांनी कागदपत्रे पाहून आणि परिस्थिती चे गांभीर्य पाहून लगेचच पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बोलवून रेशनिग कार्ड देण्याचे आदेश दिले. आणि अवघ्या काही मिनिटात कल्पना ढवळे यांनी त्या नवीन शिधापत्रिकेवर हस्ताक्षर करून या जोडप्याची अनेक वर्षांपासून अडचण दूर केली. बाटे कुटुंबियाच्या हातात रेशनकार्ड देताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. 


कोणत्याही शासकीय सवलती मिळण्यासाठी शिधापत्रिका आवश्‍यक असते आणि या अपंग दांपत्याला काही कारणांनी शिधापत्रिकाच नसल्याने शासकीय लाभ मिळत नव्हते. यापार्श्वभूमीवर आज कायदा आणि व्यवहाराची सांगड घालत तहसीलदार कल्पना ढवळे यांनी वेगळा पायंडा पाडण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केला. यावर

प्रतिक्रिया व्यक्त करताना तहसीलदार ढवळे यांनी, आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच मदत केली. मात्र त्या दांपत्याच्या चेहऱ्यावरील समाधान सुखावणारे होते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT